Saif Ali Khan Stabbed : अभिनेता सैफ अली खानवर जीवघेणा चाकू हल्ला झाल्यानंतर तो रिक्षाने रुग्णालयात पोहोचल्याची माहिती समोर येत आहे. बुधवारी मध्यरात्री सैफ अली खानच्या घरी चोरीच्या प्रयत्नात असलेल्या अज्ञात हल्लेखोराने अभिनेत्यावर जीवघेणा हल्ला केला. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. सैफ अली खान चोरासोबत झालेल्या झटापटीत जखमी झाला. यानंतर त्याचा मुलगा इब्राहिम अली खान वडिलांना घेऊन रुग्णालयात गेला. सैफला तातडीनं लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यावेळी सैफ अली खान कारने नाही तर रिक्षाने रुग्णालयात पोहोचल्याचं सांगितलं जात आहे.


जखमी सैफ रिक्षाने रुग्णालयात पोहोचला


आलिशन गाड्या दारात उभ्या असतानाही सैफ अली खान रिक्षाने रुग्णालयात पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. एनडीव्हीच्या वृत्तानुसार ही महिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर अवघ्या काही अंतरावर राहत असलेला त्याला मुलगा इब्राहिम घटनास्थळी पोहोचला. यानंतर ड्रायव्हर नसल्या कारणाने सैफ अली खानला रिक्षातून रुग्णालयात न्यावं लागलं. याच कारणामुळे आलिशान गाड्या दारात उभ्या असतानाही सैफ अली खानला रिक्षाने रुग्णालयात जावं लागलं.


हल्लेखोर घरात शिरला कसा?


पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोराने शेजारच्या इमारतीतून सैफ अली खानच्या इमारतीत उडी मारली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहिलं की, संशयित दुसऱ्या इमारतीच्या कंपाऊंडमधून सैफच्या इमारतीत शिरला. आरोपी सैफच्या घरात शिरला, त्यावेळी काही शोधण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी त्याचा घरातील कर्मचारी लिमा यांनी त्याला हटकलं, त्यावेळी त्याने तिच्यावर हल्ला चढवला. आरडा-ओरड एकूण सैफ तिच्या मदतीला धावला. यावेळी दोघांमध्ये झटापट झाली आणि प्रतिकार करताना आरोपीने हल्ला चढवला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.


घटनास्थळाची फॉरेन्सिक तपासणी


सूत्रांनी एबीपीला दिलेल्या माहितीनुसार की, सैफ-करीनाच्या इमारतीशेजारी 'पेतफिना' नावाचा एक खूप जुना बंगला आहे. आरोपी इमारतीच्या कंपाऊंड वॉलवरून उडी मारून आत आला असावा. कारण, फॉरेन्सिक टीमने त्या भिंतीची आणि त्या जागेचीही फॉरेन्सिक तपासणी केली आहे. सूत्रानुसार, ही भिंत 6-8 फूट उंच आहे आणि त्यावर चढणे इतकं कठीण नाही. 


महत्वाच्या इतर बातम्या :


Saif Ali Khan : सैफ अली खानवर धारदार शस्त्राने हल्ला, लेक इब्राहिम रुग्णालयात घेऊन गेला; महत्त्वाचे 5 मुद्दे; आतापर्यंत काय-काय घडलं?