Saif Ali Khan Attack & Home Invasion : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या घरी चोरीच्या प्रयत्नात असलेल्या अज्ञात हल्लेखोराने त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. अज्ञात व्यक्तीने सैफच्या घरी त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. हल्लेखोराने सैफवर सपासप वार केले, या हल्ल्यात सैफ गंभीर जखम झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, या प्रकरणाचा तपास पोलिस आणि क्राईम ब्रांचकडून सुरु आहे. या प्रकरणात आतापर्यंत काय-काय घडलं ते जाणून घ्या.


1. जखमी सैफला इब्राहिम रुग्णालयात घेऊन गेला


इब्राहिम अली खान जखमी सैफ अली खानला रुग्णालयात घेऊन गेला. सैफ अली खानला त्याचा मुलगा इब्राहिम अली खान रुग्णालयात घेऊन गेला. तो सैफ अली खानपासून काही अंतरावर राहतो. सैफवर हल्ला झाल्यानंतर त्याला लीलावती रुग्णालयात नेण्यात आलं. आता त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. डॉक्टरांच्या परवानगीनंतर त्याचा जबाब घेतला जाईल.


2. पोलिसांच्या 15 पथकांकडून कसून तपास


सैफ अली खानवरील हल्ल्याच्या तपासासाठी मुंबई पोलिसांनी स्थानिक आणि गुन्हे शाखेच्या एकूण 15 पथकांची स्थापना केली आहे. क्राईंम ब्रांचची 8 पथके आणि मुंबई पोलिसांची 7 पथके या प्रकरणाचा कसुन तपास करत आहे. पोलीस या प्रकरणाचा प्रत्येक अँगल तपासत आहेत. पोलिस सीसीटीव्ही फुटेजही तपासत आहेत.


3. दोन संशयितांचा शोध सुरु


पोलिसांच्या तपासात, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पोलिसांना दोन संशयित दिसले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, यापैकी एक व्यक्ती हल्लेखोर असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यापैकीच एकाने सैफवर हल्ला केला का, याचा तपास आता पोलिस करत आहेत. त्यासाठी संशयित दोघांचाही शोध सुरू आहे.


4. सैफच्या घरी फरशी पॉलिशचं काम 


सैफ अली खानच्या घरी गेल्या दोन-तीन दिवसांपासून फरशी पॉलिश करण्याचे काम सुरू आहे. पोलीस या मजुरांचीही चौकशी करत आहेत. पोलिसांनी सैफ अली खानच्या घराचे सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा कोणीही येताना किंवा जाताना दिसले नाही. सैफवर हल्ला करणारा आरोपी चोरीच्या उद्देशाने घरात घुसला असावा असा पोलिसांना सुरुवातीला संशय आहे. या संदर्भात, पोलिस गेल्या आठवड्यात घरी कामावर आलेल्या एका व्यक्तीची चौकशी करत आहेत.


5. सैफच्या प्रकृतीत सुधारणा


सैफ अली खानच्या टीमने एक अधिकृत निवेदन जारी केले आहे. यामध्ये त्यांनी सांगितलं, सैफ अली खानवर शस्त्रक्रिया झाली आहे आणि तो धोक्याबाहेर आहे. सैफ अली खानची प्रकृती सुधारत आहे आणि डॉक्टर त्याच्यावर पूर्णपणे लक्ष ठेवून आहेत. कुटुंबातील सर्व सदस्य सुरक्षित आहेत आणि पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. लीलावती रुग्णालयातील डॉ. निरज उत्तमनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'सैफ अली खानला मध्यरात्री 3.30 वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्यावर 6 वार झाले होते. यापैंकी दोन जखमा खोल होत्या, एक जखम पाठीचा कण्याजवळ, तर दुसरी जखम मानेजवळ होती'. 






महत्त्वाच्या इतर बातम्या :


हायप्रोफाईल एरियात घर, आसपास CCTV चं जाळं, गेटवर सुरक्षारक्षकांचा वेढा, तरीही सैफच्या घरात चोर घुसलाच कसा?