Saif Ali Khan Hospital Bill : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणारा हल्लेखोर आता पोलिसांच्या हाती लागला आहे. सैफवर चाकूहल्ला करुन फरार झालेल्या आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. सैफ अली खानवर त्याच्या राहत्या घरी बुधवारी मध्यरात्री हल्ला झाला, त्यानंतर आता शनिवारी रात्री आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. दरम्यान, चोराच्या हल्ल्यात सैफ अली खान गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार करण्यात आले. रुग्णालयाचं बिल 35 लाख झाल्याची माहिती समोर आली आहे. यासोबत सैफला रुग्णालयातून डिस्चार्ज कधी मिळणार याची तारीखही समोर आली आहे.


सैफ अली खानवर 'लीलावती'मध्ये उपचार


चोरीच्या प्रयत्नात घरात घुसलेल्या हल्लेखोराने सैफ अली खानवर धारदार चाकूने हल्ला केला. चोराने धारदार शस्त्राने सेफवर सपासप वार केले. या हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला होता. सैफच्या पाठीवर, मानेवर आणि हातावर एकूण सहा वार होते, त्यातील दोन वार खोल होते. सैफच्या मानेवर 10 सेमी. जखम होती, तर पाठीत चाकूचा तुकडा अडकला होता. चोराने सैफच्या पाठीत चाकू भोसकला, त्यावेळी चाकूचा तुकडा त्याच्या पाठीत अडकला. त्यानंतर सैफला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि त्याच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली.


लीलावती रुग्णालयाचं बिल 35 लाख


सैफ अली खानच्या पाठीत अडकलेला अडीच इंचाचा चाकूचा तुकडा डॉक्टरांनी बाहेर काढल्यानंतर आता त्याची प्रकृती स्थिर आहे. लीलावती रुग्णालयात त्याच्यावर हे उपचार करण्यात आले. दरम्यान, सैफचं लीलावती रुग्णालयाचं बिल समोर आलं आहे. त्याच्या इन्शुरन्स क्लेमचा फोटो सोशल मीडियावर समोर आलं आहे. यामध्ये सैफचं लीलावती रुग्णालयाचं बिल 35,98,700 रुपये असल्याचं समोर आलं आहे.


इन्शुरन्स क्लेमचा आकडा समोर






'या' दिवशी मिळणार डिस्चार्ज


लीलावती रुग्णालयात सैफ अली खानला 16 जानेवारी रोजी मध्यरात्री दाखल करण्यात आलं. त्यानंतर 17 जानेवारीला पहाटे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. आता तो डॉक्टरांच्या निगराणी खाली असून त्याची प्रकृती स्थिर आहे. सैफ अली खानला 21 जानेवारी रोजी डिस्चार्ज मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रुग्णालयाच्या बिलाच्या व्हायरल फोटोवर डिस्चार्जची तारीख दिसत आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Saif Ali Khan Attack : 'हल्लेखोराने दागिन्यांना हातही लावला नाही', आरोपीचा नेमका प्लॅन काय होता? करिनाने पोलिसांना जबाबात सगळंच सांगितलं...