Saif Ali Khan: प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहे. दोघेही अनेकदा त्यांच्या मुलांसोबत स्पॉट होतात.पापाराझी अनेकवेळा सैफ आणि करिनाचे फोटो क्लिक करतात. नुकताच सैफ हा करीना आणि त्याचा मुलगा जेह यांच्यासोबत स्पॉट झाला. यावेळी काही पापाराझींनी जेह आणि सैफचे फोटो क्लिक केले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये सैफ हा पापाराझीवर भडकलेला दिसत आहे.


पापाराझीवर भडकला सैफ


सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये सैफ पापाराझींना फटकारताना दिसत आहे.  व्हिडीओमध्ये दिसते की, सैफ हा त्याचा धाकटा मुलगा जेह याचा हात धरून स्टेडियममधून बाहेर येतो. यादरम्यान पापाराझी त्यांचे फोटो काढतात. पण सैफला ही गोष्ट अजिबात आवडत नाही आणि मग तो पापाराझींवर चिडतो. तो म्हणतो, "एक सेकंद भाईसाहेब, आधी लाइट्स बंद करा... इथे मुलं फुटबॉल खेळत आहेत आणि तुम्ही लोक याला फिल्मी इव्हेंट बनवत आहात." 


सैफ अली खान आणि करीना कपूर हे स्टेडियममध्ये पोहोचले होते जिथे त्यांची दोन मुले तैमूर आणि जेह हे फुटबॉल खेळत होते. काही दिवसांपूर्वी सैफ, करीना, तैमूर आणि जेह हे हॉलिडेला गेले होते. 


पाहा व्हिडीओ:






सैफ आणि करीना यांनी 16 ऑक्टोबर 2012 रोजी लग्न केले. 2016 मध्ये  करीनानं तैमूरला जन्म दिला. फेब्रुवारी 2021 मध्ये करीनानं जेहला जन्म दिला. 


सैफ आणि कतरिनाचे चित्रपट


सैफ अली खानचा आदिपुरुष हा चित्रपट गेल्या वर्षी रिलीज झाला. यामध्ये सैफनं रावणाची भूमिका साकारली होती. तर करिनाब ही ओटीटीवरील 'जाने जान' या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला आली. याशिवाय करीनाच्या 'द बकिंघम मर्डर्स' या चित्रपटाचा BFI लंडन फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रीमियर झाला.आता करीनाच्या सिंघम-3 या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. काही दिवसांपूर्वी 'सिंघम 3' या चित्रपटामधील करीनाचा लूक रिलीज करण्यात आला . तर सैफच्या देखील आगामी चित्रपटांची प्रेक्षक वाट बघत आहेत. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


VIDEO: एअरपोर्टवरुन आई-वडिलांसोबत हसत-खेळत आला, पण गाडीजवळ जाताच ढसाढसा रडायला लागला; सैफच्या लेकाच्या व्हिडीओची सर्वत्र चर्चा