मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर त्याच्या आयुष्यावर आधारीत चित्रपट येऊ घातला आहे. 'सुसाइड या मर्डर : एक स्टार खो गया' असं या चित्रपटाचं नाव असणार आहे. या चित्रपटात सुशांतची भूमिका टिकटॉक स्टार सचिन तिवारी साकारणार आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर टिकटॉक स्टार सचिन तिवारीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सचिन हुबेहुब सुशांतसारखाच दिसतो, असा दावा नेटकऱ्यांकडून करण्यात येत होता. त्यामुळे सुशांतच्या आयुष्यावर आधारीत असणाऱ्या या चित्रपटात सचिन तिवारी मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे.
'सुसाइड या मर्डर : एक स्टार खो गया' (Suicide or Murder) या चित्रपटाची निर्मिती विजय गुप्ता करणार आहेत. तर अद्याप या चित्रपटाचं दिग्दर्शन कोण करणार, हे समोर आलेलं नाही. मीडिया रिपोर्टनुसार, सध्या या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम सुरु असून सप्टेंबरपासून शुटिंग सुरु केलं जाऊ शकतं. मुंबई आणि पंजाबमधील काही ठिकाणी या चित्रपटातं शुटिंग केलं जाऊ शकतं, अशी प्राथमिक माहिती सध्या समोर आली आहे. तसेच याच वर्षी ख्रिसमसला हा चित्रपट प्रदर्शित केला जाऊ शकतो.
विजय गुप्ता निर्मित 'सुसाइड या मर्डर : एक स्टार खो गया' या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. प्रोडक्शन हाऊसच्या वतीने जारी करण्यात आलेल्या पोस्टमध्ये सचिन तिवारी सुशांतच्या भूमिकेत दिसून येत आहे. या पोस्टरवर सचिनला इन्ट्रोड्यूस करताना त्याचा उल्लेख आऊटसायडर (Outsider) असा केला आहे. कारण सुशांतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमध्ये प्रचंड खळबळ माजली असून बॉलिवूडमधील नेपोटिझमचा मुद्दा ऐरणीवर आला होता. तसेच अनेकजण सुशांत इडस्ट्रीमध्ये आऊटसायडर होता. त्यामुळेच त्याला सतत सगळ्यांच्या टिकेचा सामना करावा लागत होता असा आरोप करत आहेत.
काय सांगता हुबेहुब सुशांत सिंह राजपूत?; सोशल मीडियावर 'या' तरूणाचे फोटो व्हायरल
दरम्यान, सुशांतने 14 जून रोजी आपल्या वांद्यातील राहत्या घरात फाशी घेत आत्महत्या केली होती. प्रोफेशनल लाइफमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या सुशांतने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उलचललं याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. याप्रकरणी मुंबई पोलीस तपास करत आहेत. मुंबई पोलीस सुशांतच्या पर्सनल आणि प्रोफेशनल असे प्रत्येक अॅन्गल तपासून पाहत आहेत. तसचे सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांची चौकशीही केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण, आदित्य चोप्राने पोलीस चौकशीत सर्व आरोप फेटाळले
सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण; रिया चक्रवर्तीची अमित शाहांकडे सीबीआय चौकशीची मागणी