Amitabh Bachchan: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा 11 ऑक्टोबर रोजी 81 वा वाढदिवस आहे. बिग बींचा वाढदिवस हा त्यांच्या चाहत्यांसाठी खास असणार आहे. कारण अमिताभ बच्चन यांच्या 81 व्या वाढदिवसापूर्वी त्यांच्या काही खास वस्तूंचा लिलाव करण्यात येणार आहे.
बिग बींच्या वाढदिवसापूर्वी 5 ऑक्टोबरपासून 7 ऑक्टोबरपर्यंत त्यांच्या काही खास वस्तूंचा लिलाव करण्यात येणार आहे. हा लिलाव Rivas & Ives द्वारे आयोजित केला जात आहे. Rivas & Ives हे एक ऑक्शन हाऊस आहे.
कोणत्या वस्तूंचा होणार लिलाव?
'बच्चनेलिया' नावाचा या ऑक्शन कार्यक्रमाद्वारे अमिताभ बच्चन यांच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीचा उत्सव साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमात चाहत्यांना अमिताभ बच्चन यांच्या सिनेमॅटिक करिअरला पुन्हा पाहण्याची संधी मिळणार आहे. या ऑक्शनमध्ये अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांचे काही पोस्टर्स, फोटो, लॉबी कार्ड, शोकार्ड, फिल्म बुकलेट आणि ओरिजनल आर्टवर्क या वस्तू लिलावासाठी ठेवण्यात येणार आहेत.
अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसापूर्वी होणार्या लिलावात अनेक खास गोष्टी असणार आहे. त्यामध्ये 'जंजीर', 'दीवार', 'फरार'चे शोकार्ड सेट, 'शोले' चित्रपटाची फोटोग्राफ, 'शोले' चित्रपट रिलीज झाल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या रमेश सिप्पी यांच्या खास पार्टीतील चार फोटो, 'मजबूर' चित्रपटाचे दुर्मिळ पोस्टर्स यांचा समावेश असणार आहे. प्रसिद्ध ग्लॅमर फोटोग्राफर गौतम राजाध्यक्ष यांनी शूट केलेले अमिताभ यांचे दुर्मिळ स्टुडिओ पोर्ट्रेट देखील लिलावात ठेवण्यात येणार आहेत.
अमिताभ बच्चन यांचे चित्रपट
श्री. नटवरलाल, द ग्रेट गॅम्बलर , कालिया , नसीब', सिलसिला यांसारख्या चित्रपटांमध्ये अमिताभ बच्चन यांची काम केलं आहे. चित्रपटांबरोबरच बिग बी हे काही कार्यक्रमांच्या माध्यमातून देखील प्रेक्षकांच्या भेटीस येतात. ते कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतात. अमिताभ बच्चन यांच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. त्यांचे प्रोजेक्ट के आणि गणपत हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. त्यांच्या गणपत या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला. या टीझरमधील अमिताभ बच्चन यांच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: