Sachin Pilgaonkar : भगत सिंह कोश्यारींच्या वादग्रस्त विधानावर सचिन पिळगावकर म्हणाले...

Sachin Pilgaonkar : नागपुरात पार पडलेल्या एका कार्यक्रमात भगत सिंह कोश्यारींच्या वादग्रस्त विधानावर सचिन पिळगावकर यांनी त्यांचे मत मांडले आहे.

Continues below advertisement

Sachin Pilgaonkar On Bhagat Singh Koshyari Statement : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) वादग्रस्त वक्त्यवावर सध्या चर्चेत आहेत. गुजराती, राजस्थानी गेले तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, असं वक्तव्य राज्यपालांनी केलं होतं. त्यांनंतर त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेत अनेकांनी टीका केली. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेक मंडळी आपलं मत मांडत आहेत. यामध्ये आता मराठी मनोरंजनसृष्टीत लोकप्रिय अभिनेते सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) यांनीदेखील मत मांडले आहे. 

Continues below advertisement

नागपुरात पार पडलेल्या एका कार्यक्रमात भगत सिंह कोश्यारींच्या वादग्रस्त विधानावर सचिन पिळगावकर म्हणाले,"आम्हाला यासंदर्भात ज्ञान नाही, असं ते का म्हणाले हे तेच सांगू शकतात. राजकीय गोष्टींशी आमचा काहीही संबंध नाही. त्यांनी खुलासा केला हेदेखील आम्हाला माहीत नाही. राजकारण हा आमचा विषय नाही. पण आम्ही मराठी आहोत याचा आम्हाला अभिमान आहे." 

राज्यपाल नक्की काय म्हणाले होते?

गुजराती आणि राजस्थानी निघून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही आणि मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही असं वक्तव्य भगसिंह कोश्यारींनी केलं आहे.  काल मुंबईतील अंधेरी पश्चिम भागात स्थानिक चौकाला दिवंगत श्रीमती शांतीदेवी चंपालालजी कोठारी यांचे नाव देण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. राज्यपालांचं हे वक्तव्य म्हणजे महाराष्ट्राचा अपमान आहे, त्यांना नारळ द्या अशी मागणी आता विरोधकांनी केली आहे.  धक्कादायक बाब म्हणजे कोश्यारी यांनी ज्यावेळी हे वक्तव्य केलं त्यावेळी स्टेजवर भाजप आमदार नितेश राणे, भारती लव्हेकर आणि खासदार नवनीत राणा देखील उपस्थित होत्या. मात्र राज्यपालांच्या या वक्तव्याचा निषेध न करता राज्यपालांच्या भाषणावर या उपस्थित नेत्यांनी टाळ्या वाजवल्याची बाब समोर आली आहे. 

ओटीटी मुळे काही फरक पडत नाही : सचिन पिळगावकर

नागपुरातील कार्यक्रमादरम्यान सचिन पिळगावकर म्हणाले, ओटीटी मुळे काही फरक पडत नाही. रिजनल सिनेमांवर अजूनही विश्वास आहे. या सिनेमांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो. याचे चांगले उदाहरण म्हणजे 'पुष्पा' सिनेमा. टीव्ही, ओटीटी आलं असलं तरी सिनेमागृह बंद होऊ शकत नाही. सिनेमा चांगला असेल तर प्रेक्षक तो नक्की पाहतात. 

संबंधित बातम्या

Bhagat Singh Koshyari : राज्यपालांच्या मराठी विरोधी वक्तव्याच्या निषेधार्थ ठिकठिकाणी निदर्शने, भाजपसह सर्वपक्षीय नेत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

राज्यपालांच्या वक्तव्याशी भाजप सहमत नाही; देवेंद्र फडणवीसांनी थेटच सांगितलं...

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola