Sairat Fame Actor Arbaz Shaikh Girlfriend Photo : मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी ठरलेला चित्रपट म्हणजे नागराज मंजुळे यांचा सैराट. 2016 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट केवळ एक प्रेमकथा नाही, तर ती एका खोल सामाजिक व्यवस्थेवर भाष्य करणारी कलाकृती आहे. ग्रामीण भागातील परश्या आणि आर्चीची लवस्टोरी आजही महाराष्ट्रात चर्चेचा विषय असते. या सिनेमातील मुख्य पात्रांशिवाय गाजलेली महत्वाची पात्रं म्हणजे..सैराटमधील लंगड्या आणि बांगड्यावाल्या भाभीचा सल्ल्या ही होती...दरम्यान, आता बांगड्यावाल्या भाभीचा सल्ल्या म्हणजे अभिनेता अरबाज शेख याच्या वैयक्तिक आयुष्याबाबतची एक बातमी चर्चेत आहे. 

अभिनेता अरबाज शेख लवकरच त्याच्या गर्लफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. अरबाजने यापूर्वी त्याच्या गर्लफ्रेंडसोबत फोटो शेअर केले होते. हे फोटो पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सिमरन असं त्याच्या गर्लफ्रेंडचं नाव आहे. 

सैराट सिनेमाने अरबाज शेख याला कलाकार म्हणून एक वेगळी ओळख मिळाली. चित्रपटाची कथा परशा आणि आर्ची या दोन पात्रांभोवती फिरते. परशा एक गरीब मच्छीमार कुटुंबातील मुलगा असून, आर्ची ही एक सत्ताधारी घराण्यातील खूप आत्मविश्वासू मुलगी आहे. दोघांमधील प्रेम हे सहज, स्वाभाविक आणि निरागस आहे, पण समाजाच्या घट्ट विणलेल्या चौकटीमध्ये हे प्रेम नाकारलं जातं. आर्चीच्या घरच्यांना हे प्रेम मान्य नसतं, कारण त्यांच्या नजरेत जात हीच प्रतिष्ठेची, सत्तेची आणि सन्मानाची गोष्ट आहे.

सैराटचे विशेष म्हणजे त्याची वास्तववादी मांडणी. नागराज मंजुळे यांनी सिनेमातील सर्वच पात्रं, संवाद, दृश्यं आणि प्रसंग इतके नैसर्गिक ठेवले आहेत की, प्रेक्षक स्वतःला त्या गावात, त्या परिस्थितीत असल्यासारखं अनुभवतो. दिग्दर्शकाने ग्रामीण भागातील जीवन, भाषा, रहाणीमान आणि तरुणाईची धडपड यांचं प्रामाणिक चित्रण केलं आहे.

सिनेमातील संगीतही एक वेगळीच जादू घेऊन येतं. अजय-अतुल यांचे संगीत आणि गीते कथानकात सहज मिसळून जातात. “झिंग झिंग झिंगाट” किंवा “याड लागलं रे” यासारखी गाणी आजही लोकांच्या ओठांवर आहेत. संगीत, अभिनय आणि छायाचित्रण या सर्वच पातळ्यांवर सैराटने उच्च प्रतीचा दर्जा राखला आहे.

पण सैराटचा खरा गाभा आहे तो त्याचा शेवट. कथानक जेव्हा एका नव्या सुरुवातीसाठी वाट शोधतं, तेव्हा शेवट पूर्णतः हादरवणारा आणि विचार करायला लावणारा ठरतो. हे शेवटचं दृश्य प्रेक्षकाला अस्वस्थ करतं. प्रेम, जात, प्रतिष्ठा, आणि हिंसा यांचा स्फोट होतो आणि अखेरीस समाजातील कटू सत्य प्रकट होतं.

सैराट फक्त एक हिट सिनेमा नव्हे, तर एक सामाजिक भाष्य आहे. या सिनेमाने केवळ मराठी प्रेक्षकांनाच नव्हे तर संपूर्ण भारताला अस्वस्थ केलं. अनेक भाषांमध्ये याचे रिमेक्स झालेले पाहायला मिळाले. हा चित्रपट आपल्याला विचार करायला लावतो. 

 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

अभिनेत्री समंथा रुथ प्रभू पापाराझींवर भडकली, म्हणाली 'थांबवा हे सगळं' VIDEO

संजय कपूर यांचं पार्थिव कुठंय? 6 दिवस उलटले तरीही अंत्यसंस्कार नाहीच; कुटुंबातील लोकही शांत