Karisma Kapur Ex Husband Sunjay Kapur Funeral :  अभिनेत्री करिश्मा कपूरचा घटस्फोटीत पती  आणि उद्योगपती संजय कपूर यांचे 12 जून रोजी इंग्लंडमध्ये पोलो खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्यांचे अंतिम संस्कार भारतात होणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, 6 दिवस उलटून गेल्यानंतरही त्यांच्यावर अंत्यसंस्कार झालेले नाहीत. तसेच संजय कपूर यांच्या निधनानंतर त्यांच्या तिसऱ्या पत्नीबाबतही कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न उपस्थित झाले आहेत – संजय कपूर यांचे पार्थिव नेमके आहे तरी कुठे?

Continues below advertisement


संजय कपूर यांचे पार्थिव कुठे आहे?


संजय कपूर यांच्या निधनाला सहा दिवस झाले असूनही अजूनपर्यंत त्यांच्या अंत्यसंस्काराची प्रक्रिया पार पडलेली नाही. आधी सांगितले गेले होते की त्यांचे अंतिम संस्कार दिल्लीमध्ये होतील. मात्र, ते अमेरिकेचे नागरिक असल्यामुळे काही कायदेशीर अडथळे येत आहेत, ज्यामुळे पार्थिव भारतात आणण्यात विलंब होत आहे. परंतु, आश्चर्याची गोष्ट म्हणजे या सहा दिवसांमध्ये ना त्यांच्या अंतिम संस्काराबद्दल काही माहिती मिळाली आहे, ना त्यांच्या पार्थिवाचे ठिकाण जाहीर करण्यात आले आहे.


संजय कपूर यांचे पार्थिव लंडनमध्येच अडकलं आहे?


काहीजण प्रश्न विचारत आहेत की, कायदेशीर प्रक्रियेमुळे संजय कपूर यांचे पार्थिव अजूनही लंडनमध्ये अडकले आहे का? किंवा कायदेशीर अडचणींमुळे लंडनमध्येच त्यांचे अंतिम संस्कार पार पडले आहेत का? अथवा त्यांचे पार्थिव गुपचूप भारतात आणून त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत का?


नेटिझन्सच्या शंका आणि कुटुंबाची शांतता


संजय कपूर यांच्या अंतिम संस्कारांबाबत नेटिझन्स अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत. मात्र, संजय कपूर यांच्या कुटुंबाकडून अजूनपर्यंत यासंदर्भात कोणताही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही. त्यांच्याकडे अमेरिकेचे नागरिकत्व असल्यामुळे काही कायदेशीर प्रक्रिया अडचणीचे कारण ठरत असल्याचे सांगण्यात येत आहे. पण त्यानंतरही त्यांच्या अंत्यसंस्काराबद्दल कोणतीही अद्ययावत माहिती उपलब्ध नाही.


तिसरी पत्नी प्रिया सचदेव यांचे मौन


संजय कपूर यांच्या निधनानंतर त्यांच्या तिसऱ्या पत्नी प्रिया सचदेवही अजूनपर्यंत मीडियासमोर आलेल्या नाहीत. त्यांच्याबद्दल सध्या कोणतीही माहिती उपलब्ध नाही. त्यांनी आपला सोशल मीडिया अकाउंटदेखील प्रायव्हेट केला आहे. संजय कपूर यांचं कुटुंब दिल्लीमध्ये राहते. त्यांच्या कुटुंबात पत्नी प्रिया सचदेव, मुलगा आजरियस, सावत्र मुलगी सफीरा, आई रानी कपूर आहेत. त्यांच्या दोन बहिणी आहेत, ज्या परदेशात राहतात. त्यांच्या वडिलांचे नाव सुरेंद्र कपूर होते आणि त्यांचे निधन 2015 साली झाले होते.


इतर महत्त्वाच्या बातम्या


सौंदर्य असं की कोणीही प्रेमात पडेल, 5 वर्षात 11 हिट सिनेमे; पण वयाच्या 22 व्या वर्षी प्रेमासाठी आयुष्य संपवलं