Rupali Chakankar On Gautami Patil Viral Video : नृत्यांगणा गौतमी पाटीलचा (Gautami Patil) कपडे बदलतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आता या व्हायरल व्हिडीओ प्रकरणाची (Gautami Patil Video Viral) दखल महिला आयोगाने घेतली आहे. रुपाली चाकणकर यांनी ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. 


नेमकं प्रकरण काय? 


गौतमी पाटीलचा पुण्यातील एका कार्यक्रमातील कपडे बदलतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कार्यक्रमादरम्यान गौतमी कपडे बदलत असताना ते शूट करुन तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा प्रकार समोर आला आहे. गौतमी पाटीलची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे तिला बदनाम करण्यासाठी तिचा असा व्हिडीओ शूट करुन व्हायरल केल्याची चर्चा आहे. 


गौतमी पाटील व्हायरल व्हिडीओ प्रकरणाची दखल महिला आयोगानेही घेतली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी ट्वीट केलं आहे की, "लावणी कलाकार गौतमी पाटील यांचे चोरुन चित्रीकरण करत चेंजिंग रुममधील खासगी व्हिडीओ समाज माध्यमांवरुन प्रसारित केला असल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाणे, पुणे येथे तक्रार नोंदवण्यात आली असल्याचं वृत्त आहे". 










रुपाली चाकणकर पुढे म्हणाल्या की, "महिलांबाबतचे सायबर गुन्हे रोखण्याकरिता कृती कार्यक्रम जाहीर करावा असे महिला आयोगाने सायबर विभाग, पोलीस महानिरीक्षक यांना पत्राद्वारे कळवलं आहे. एकंदरीतच महिल्यांच्याप्रती सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येते. हे प्रकार रोखण्याकरिता विशेष पथकाचे शीघ्र कृती दल स्थापन करुन धडक कार्यवाही मोहीम राबविल्यास गुन्हेगारांना वचक बसून गैरप्रकार आटोक्यात येतील". 


गौतमी पाटीलच्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास घेत आहेत. गौतमी पाटीलचं व्हायरल व्हिडीओ प्रकरण सध्या सोशल मीडियावर चांगलच चर्चेत आहे. या प्रकारावर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत आहेत.


संबंधित बातम्या


Gautami Patil : नाद करा पण आमचा कुठं... वाढदिवस लेकाचा, हौस बापाची; चिमुकल्याच्या वाढदिवसानिमित्त थेट गौतमीच्या कार्यक्रमाचं आयोजन