Runway 34 Trailer : अजय देवगणच्या (Ajay Devgn) बहुप्रतिक्षित 'रनवे 34'चा (Runway 34) दुसरा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलरमध्ये अजय देवगण कॅप्टन विक्रांत खन्नाच्या भूमिकेत दिसत आहे. हा सिनेमा 29 एप्रिलला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
ट्रेलरमध्ये अजय देवगण पायलटच्या भूमिकेत असून प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत विमानातील लोकांचे प्राण वाचवताना दिसत आहे. या सिनेमात अजय देवगणसोबत अमिताभ बच्चन आणि रकुलप्रीत सिंह यांच्यादेखील प्रमुख भूमिका आहेत. सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरादेखील अजय देवगणने सांभाळली आहे.
‘रनवे 34’ चित्रपटाची कथा जेट एअरवेजच्या दोहा कोची फ्लाइटच्या सत्य घटनेवरून प्रेरित आहे. ही घटना 2015ची आहे, जेव्हा खराब हवामान आणि अगदी कमी दृश्यमानता असूनही, विमानाच्या पायलटने अनेक अडचणींना न जुमानता विमान विमानतळावर उतरवले. अजय देवगणच्या प्रोडक्शन हाऊसने या सिनेमाची निर्मिती केली आहे. सिनेमा ईदच्या मुहूर्तावर म्हणजेच 29 एप्रिल 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
संबंधित बातम्या