PHOTO : ‘छोटी बहू’ रुबिका दिलैकची पतीसोबत गोव्यात धमाल, सोशल मीडियावर फोटो शेअर करत म्हणतेय...

Rubina Dialik

1/6
टेलिव्हिजनची छोटी बहू म्हणून प्रसिद्ध असलेली रुबिना दिलैक ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती बिग बॉस 14मध्ये स्पर्धक म्हणून दिसली आहे. रुबिनाने या पर्वाचे विजेतेपद जिंकले होते.
2/6
कामातून वेळ काढून रुबिना सध्या सुट्टीचा आनंद घेत आहे. ती पती अभिनवसोबत गोव्याला गेली आहे. अलीकडेच तिने तिच्या पतीसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत, जे चाहत्यांना खूप आवडले आहेत.
3/6
हे व्हेकेशन फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे – सफरनामा. फोटोंमध्ये रुबिना स्कर्ट आणि टॉपमध्ये दिसत आहे. कूल लुकसाठी तिने गॉगल लावला आहे.
4/6
तर, दुसऱ्या फोटोत ती तिच्या पतीसोबत पोज देत आहे. चाहत्यांनाही रुबिनाचे हे फोटो खूप आवडत आहेत.
5/6
एका चाहत्याने कमेंट करत लिहिले ‘हॉटनेस क्वीन’. तर दुसऱ्याने लिहिले, ‘व्वा.’ याशिवाय इतर वापरकर्तेही अशाच कमेंट करत आहेत.
6/6
अभिनेत्रीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर, ती सध्या तिच्या 'अर्ध' चित्रपटात व्यस्त आहे. नुकतेच तिने या चित्रपटाशी संबंधित एक पोस्टरही शेअर केले आहे. (Photo : Rubina Dilaik/IG)
Sponsored Links by Taboola