Oscars 2023: ऑस्करनं (Oscars 2023) जगभरातील 301 सिनेमांची रिमाइंडर लिस्ट जाहीर केली आहे. ज्यामध्ये अवतार- द वे ऑफ वॉटर (Avatar: The Way of Water), भारतातील कांतारा (Kantara), गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi), द कश्मीर फाईल्स (The Kashmir Files) 'मी वसंतराव' (Me Vasantrao) , तुझ्यासाठी काहीही (Tujhya Sathi Kahi Hi) या सिनेमांच्या नावांचा समावेश झाला आहे. आरआरआर या चित्रपटाचा देखील समावेश ऑस्करच्या रिमांडर लिस्टमध्ये झाल्यानं अनेक लोक या चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा देत आहेत. आरआरआरमधील अभिनेता राम चरणकडे नुकतीच शाहरुखनं एक मागणी केली आहे. एक ट्वीट शेअर करुन शाहरुखनं ही मागणी राम चरणकडे केली.
शाहरुखनं शेअर केलं ट्वीटशाहरुखनं नुकतच एक ट्वीट शेअर केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यानं लिहिलं, ' मेगा पॉवर स्टार राम चरणचे खूप खूप आभार. जेव्हा तुमची आरआरआरची टीम ऑस्कर भारतात आणेल, तेव्हा प्लिज मला त्याला स्पर्श करू द्या!'
राम चरणचा रिप्लायराम चरणनं शाहरुखच्या या ट्वीटला रिप्लाय करत लिहिलं, 'नक्कीच सर, हा पुरस्कार भारतीय चित्रपटसृष्टीचा असेल.' राम चरणच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले.
आरआरआर हा 24 मार्च 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटातील वीएफएक्स, चित्रपटाचं कथानक आणि चित्रपटातील कलाकारांचा अभिनय या सर्वच गोष्टींना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. हा चित्रपट ऑस्करच्या शॉर्टलिस्टेड चित्रपटाच्या यादीत सामील झाला आहे. 2022 मधील हिट आणि लोकप्रिय ठरलेल्या चित्रपटांच्या यादीत आरआरआर या पॅन इंडिया फिल्मच्या नावाचा समावेश होतो. एसएस राजामौली यांच्या या चित्रपटात ज्युनिअर एनटीआर, राम चरण, आलिया भट्ट आणि अजय देवगण यांनी प्रमुख भूमिका साकारली.
शाहरुख हा पठाण या आगामी चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये शाहरुखसोबतच दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम हे प्रमुख भूमिका साकारणार आहेत.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: