Amruta Fadnavis:  गायिका अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) या सोशल मीडियावर त्यांनी गायलेली वेगवेगळी गाणी शेअर करत असतात. अमृता यांचे 'मूड बना लिया' (Mood Banaleya) हे गाणे चार दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आले. अमृता फडणवीस यांचे हे गाणं रिलीज होऊन चार दिवस झाले आहेत, तरी देखील हे गाणे युट्यूबवर ट्रेंड होत आहे. या गाण्याला सध्या नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. 


टी सीरिजच्या युट्यूब चॅनलवर  'मूड बना लिया' हे गाणे रिलीज करण्यात आले. या गाण्याला Meet Bros यांनी संगीत दिले आहे. तर कुमार हे या गाण्याचे गीतकार आहेत. आदिल शेख यांनी या गाण्याचं दिग्दर्शन केलं आहे. 27 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. तर हे गाणं म्युझिक कॅटेगिरीत चौथ्या क्रमांकावर ट्रेंड होत आहे. आतापर्यंत एक लाखांपेक्षा जास्त नेटकऱ्यांनी या गाण्याला लाइक केलं आहे. जवळपास 24 हजारपेक्षा जास्त युझर्सनं या गाण्याला कमेंट्स केल्या आहेत.



देवेंद्र फडणवीसांना आवडले गाणे


देवेंद्र फडणवीस यांना हे नवं गाणं कसं वाटलं? असा प्रश्न एका मुलाखतीमध्ये अमृता फडणवीस यांना  विचारल्यानंतर त्या म्हणाल्या, 'देवेंद्रजींनी गाणं पाहिल्यानंतर मला सांगितलं की, गाणं चांगलं आहे. पण त्यांची पॉलिटिकल पोझिशन आहे, त्यामुळे हे गाणं नक्की ट्रोल होईल, असंही त्यांनी मला सांगितलं. या गाण्याला काही लोकांनी ट्रोल देखील केलं. मी त्यासाठी तयार होते.'


अमृता फडणवीस यांनी प्रेक्षकांचे मानले आभार


गाण्याला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या, 'मला खूप आनंद होत आहे. लोकांना हे गाणं आवडलं. लहान मुलं या गाण्यावर रिल्स तयार करत आहेत. लहान मुलांसोबतच मोठ्यांना देखील हे गाणं आवडत आहे. माझा विश्वास आहे की, एखादी स्त्री लोकांनी निगेटिव्ह कमेंट्ल केल्या तरीही काम करत राहिली, तर नक्की पुढे तिला लोकांची साथ मिळते.'


अमृता फडणवीस यांच्या या नव्या गाण्याची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. मोरया रे, वो तेरे प्यार का गम, तिला जगू द्या, शिव तांडव स्त्रोतम ही गाणी अमृता यांनी गायली आहेत. त्याचं  'वो तेरे प्यार का गम' या गाण्याला दोन मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. अमृता फडणवीस या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये हजेरी लावतात. काही दिवसांपूर्वी बस बाई बस, किचन कलाकार या कार्यक्रमामध्ये अमृता फडणीस यांनी हजेरी लावली.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Amruta Fadnavis : देवेंद्र फडणवीसांना आवडलं 'मूड बना लिया' गाणं; अमृता फडणवीस म्हणाल्या, 'ते म्हणाले, चांगलं आहे पण, नक्की ट्रोल होणार'