Singham 3 : बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) पुन्हा एकदा बॉलिवूड अभिनेता अजय देवगणसोबत (Ajay Devgn) 'सिंघम 3' (Singham 3) या आगामी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये धमाल करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याच्या आगामी प्रोजेक्टबद्दल बोलताना रोहितने एका मुलाखतीत सांगितले की, तो लवकरच 'सिंघम 3'चे शूटिंग सुरू करणार आहे. सिंघम फ्रँचायझीच्या तिसऱ्या चित्रपटाची माहिती मिळाल्यापासून चाहते अजय देवगण आणि रोहित शेट्टीच्या या चित्रपटाच्या आतुरतेने वाट पाहत आहेत.


रोहित शेट्टी सध्या ‘सर्कस’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनात व्यस्त आहे. तर अजय देवगण ‘भोला’, ‘दृश्यम 2’ आणि ‘मैदान’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. मीडिया रिपोर्टनुसार अजय आणि रोहित एप्रिल 2023मध्ये ‘सिंघम 3’चे शूटिंग सुरू करू शकतात आणि हा चित्रपट आतापर्यंतचा सर्वात मोठा कॉप युनिव्हर्स चित्रपट असेल. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिक माहिती समोर आलेली नाही.


'खतरों के खिलाडी सीझन 12'मध्ये व्यस्त रोहित


सध्या रोहित शेट्टी त्याच्या टीव्ही शो 'खतरों के खिलाडी सीझन 12'मुळे चर्चेत आहे. हा शो शेवटच्या टप्प्यावर आला आहे. लवकरच या सीझनचा विजेता घोषित होणार आहे. याशिवाय रोहित त्याची डेब्यू वेब सीरिज 'इंडियन पोलिस फोर्स'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. असे म्हटले जात आहे की, वेब सीरिजचे शूटिंग पूर्ण करताच तो 'सिंघम 3' च्या शूटिंगला सुरुवात करेल.


‘सिंघम’ला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद


2011 मध्ये आलेल्या अजय देवगणच्या ‘सिंघम’ या चित्रपटाच्या अफाट यशानंतर, या चित्रपटाचा दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी ही चित्रपट सीरिज पुढे नेली. 2014मध्ये या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजेच ‘सिंघम रिटर्न्स’ रिलीज झाला. अजयचा ‘सिंघम 2’ देखील बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. अशा परिस्थितीत 8 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आता चाहत्यांना ‘सिंघम 3’ची भेट मिळणार आहे.


लवकरच सुरु करणार चित्रीकरण


या चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक रोहित शेट्टी म्हणाला की, ‘आम्ही सिंघम 3च्या स्क्रिप्टवर काम सुरू केले आहे. सिंघम हा चित्रपट करून खूप दिवस झाले आहेत. पुढील वर्षी एप्रिलमध्ये आम्ही याच्या आगामी भागाचे शूटिंग सुरू करू. अजय देवगण सध्या त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सच्या कमिटमेंटमध्ये व्यस्त आहे आणि मी सर्कस चित्रपटात व्यस्त आहे. हे प्रोजेक्ट्स लवकर आटोपले, तर एप्रिलमध्ये आम्ही सिंघम 3चे चित्रीकरण सुरू करू.’


हेही वाचा: 


Khatron Ke Khiladi 12 : प्रतीक सहजपालवर भडकला रोहित शेट्टी; खतरों के खिलाडीमधील टास्क दरम्यान नियमांचे करत होता उल्लंघन