TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -


'टाइमपास 3' वादाच्या भोवऱ्यात


'टाइमपास 3' हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालतो आहे. काहींना हा सिनेमा आवडत आहे. तर काही जण या सिनेमात काहीही नाविण्य नसल्याचे म्हणत आहेत. अशातच या सिनेमातील एका दृश्यावर आक्षेप नोंदवला जात आहे. त्यामुळे रिलीजच्या पहिल्याच आठवड्यात हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.


जीवे मारण्याच्या धमकीनंतर सलमानला कडेकोट सुरक्षा


काही दिवसांपूर्वी  बॉलिवूडचा 'भाईजान' अशी ओळख असणाऱ्या सलमान खानला आणि त्याचे वडील लेखक सलीम खान यांना धमकीचे पत्र मिळाले होते. या पत्रात त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. सलमानला हे धमकीचं पत्र देण्यामागे बिश्नोई गँगचा खंडणीचा हेतू होता, अशी माहिती सूत्रांनी दिली होती.  धमकीचं पत्र मिळाल्यानंतर आता सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. नुकताच सलमानला मुंबई पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाना दिला आहे.


मराठमोळ्या अमृता सुभाषची बॉलिवूडनंतर हॉलिवूडमध्ये भरारी


सध्या मराठी चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. वेगवेगळ्या विषयांवर आधारित असणारे चित्रपट आणि लुघपट प्रेक्षक आवडीनं बघतात. ओटीटीवर आणि छोट्या पडद्यावर अनेक वेळा काही शॉर्ट फिल्म्स लोक पाहतात. या लुघपटांचे कथानक प्रेक्षकांना आवडते. आता एका मराठी लघुपटाचे स्क्रिनिंग थेट कॅलिफोर्नियामधील लॉस एंजलिसमध्ये होणार आहे. मासा या शॉर्ट फिल्मची निवड Hollywood International Diversity Film Festival मध्ये झाली आहे.  


'भूल भुलैया 2'नंतर कार्तिक-कियाराची जोडी दिसणार 'सत्य प्रेम की कथा' सिनेमात


बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन आणि कियारा आडवाणीचा 'सत्य प्रेम की कथा' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कार्तिक-कियाराची जोडी याआधी 'भूल भुलैया 2' या सिनेमात दिसून आली होती. या सिनेमात दोघांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. त्यामुळे प्रेक्षकांना आता 'सत्य प्रेम की कथा' या सिनेमाची उत्सुकता आहे. 


‘विक्रांत रोणा’ला चाहत्यांना तुफान प्रतिसाद


नुकताच रिलीज झालेला 'विक्रांत रोणा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. या चित्रपटाचे अवघ्या चार दिवसांतील कलेक्शन पाहता, हा चित्रपट नक्कीच मोठा विक्रम करू शकेल, असा अंदाज बांधला जात आहे. किच्चा सुदीप , जॅकलिन फर्नांडिस, निरुप भंडारी आणि नीता अशोक स्टारर ‘विक्रांत रोणा’ हा चित्रपट 28 जुलै रोजी प्रदर्शित झाला आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने जागतिक बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.


स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रंगणार 'अभिजात नाट्य महोत्सव'


15 ऑगस्टला स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सांगता होणार आहे. त्यानिमित्त संपूर्ण भारतभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवानिमित्तम मुंबईत 12 तास आणि पुण्यात 24 तास 'अभिजात नाट्य महोत्सव' रंगणार आहे. तसेच 'अभिजात'चा निर्माता आकाश भडसावळे स्वातंत्र्यदिनाला मानवंदना म्हणून पुण्यात सलग सहा प्रयोगांचा महाविक्रम करणार आहे. 


'दगडी चाळ 2'मध्ये पाहायला मिळणार डॅडी आणि सूर्यामधील संघर्ष


'दगडी चाळ' हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत एखाद्या वादळासारखा आला आणि त्यानंतर 'चुकीला माफी नाही' असे म्हणणाऱ्या अरुण गुलाब गवळी ऊर्फ ‘डॅडीं'ची पुन्हा सर्वत्र चर्चा सुरू झाली. 'दगडी चाळ 1'ला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिल्यानंतर आता या चित्रपटाचे दुसरे पर्व 18 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात झळकणार आहे. या चित्रपटाचे नवं पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित झाले असून, यात पुन्हा एकदा अंकुश चौधरी आपल्याला सूर्याच्या भूमिकेत दिसतोय.


'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेच्या प्रोमोची चर्चा


छोट्या पडद्यावरील मालिकांना प्रेक्षकांची पसंती मिळते. विविध वाहिन्यांवरील मालिका प्रेक्षक आवडीनं बघतात. आता लवकरच झी-मराठी या वाहिनीवर एक नवी मालिका प्रदर्शित होणार आहे. या मालिकेचं नाव 'अप्पी आमची कलेक्टर' असं आहे. या मालिकेचा प्रोमो झी-मराठी वाहिनीच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. कलेक्टर झालेल्या अप्पी नावाच्या एका मुलीची ही गोष्ट असणार आहे, असं प्रोमोमध्ये दिसत आहे.


'तुमची मुलगी काय करते' मालिकेचे 200 भाग पूर्ण


वेगळ्या धाटणीची अल्पावधीत लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे 'तुमची मुलगी काय करते?' चित्तथरारक असणाऱ्या 'तुमची मुलगी काय करते?' या मालिकेने नुकताच 200 भागांचा टप्पा पूर्ण केला आहे. मालिका सध्या रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. मालिकेमध्ये सध्या किलवरचा शोध सुरू आहे. 


'सिंघम 3'च्या शूटिंगला लवकरच होणार सुरुवात


'सिंघम 3' या सिनेमावर रोहित शेट्टीने काम करायला सुरुवात केली आहे. पुढल्या वर्षी एप्रिल महिन्यात या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. अजय सध्या एका सिनेमावर काम करत आहे. तसेच रोहित शेट्टीचा 'सर्कस' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे पुढल्या वर्षी एप्रिल महिन्यात या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे.