Naga Chaitanya-Samantha Divorce : साऊथ विश्वातील दोन प्रसिद्ध नावं म्हणजे अभिनेता नागा चैतन्य (Naga Chaitanya) आणि अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu). दोघांची रील आणि रियल लाईफ जोडी चाहत्यांची अतिशय लाडकी होती. मात्र, गतवर्षी या दोघांनी आपल्या घटस्फोटाची घोषणा करत चाहत्यांना मोठा धक्का दिला होता. या घटस्फोटामुळे चाहते प्रचंड नाराज झाले होते. अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने घटस्फोटानंतर आपल्या नात्यावर अनेकदा वक्तव्य केली होती. मात्र, नागा चैतन्यने या बाबतीत नेहमीच मौन बाळगले होते. मात्र, आता नागा चैतन्यने देखील यावर भाष्य केलं आहे.


नागा चैतन्यने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने या घटस्फोटावर भाष्य केलं. समंथापासून विभक्त होण्याबद्दल बोलताना नागा चैतन्य म्हणाला की, ‘माझ्या व्यावसायिक कामगिरीपेक्षा माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अधिक बोलले जाते हे खरंच खूप निराशाजनक आहे.’


हे अतिशय दुर्दैवी आहे...


अभिनेता पुढे म्हणाला, ‘दुर्दैवाने हा या कामाचा एक भाग आहे, जिथे तुमच्या वैयक्तिक आयुष्याविषयी देखील अनेक कथा गुंफल्या जातात. या गोष्टी आम्हाला सोबत घेऊन फिराव्या लागतात. त्याचा परिणाम आपल्या कामावर होऊ देणे किंवा न होऊ देणे, ही आपापली जबाबदारी आहे. माझ्या व्यावसायिक यशापेक्षा वैयक्तिक आयुष्याबद्दल जास्त बोलले जाते हे खूप निराशजनक होते. परंतु, मला वाटते की या सगळ्यापेक्षा कामावर लक्ष केंद्रित करणे जास्त महत्त्वाचे आहे. वैयक्तिक आयुष्यात या गोष्टी येतील आणि जातील. मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात नेहमीच हेच केले आहे. आम्ही दोघेही आपापल्या आयुष्यात पुढे निघून आलो आहोत. आम्हाला आमच्या कामावर लक्ष केंद्रित करायचे आहे.’


या मुलाखतीत नागा चैतन्यला विचारण्यात आले की, यापुढे तो कधी समंथा प्रभूसोबत काम करताना दिसणार आहे का? या प्रश्नाला नागा चैतन्यने अतिशय सकारात्मक उत्तर दिले. तो म्हणाला की, 'असं कधी झालं तर छान होईल, पण घडेल की नाही, हे फक्त देवालाच माहीत नाही.'


बॉक्स ऑफिसवर होणार तगडी स्पर्धा


साऊथमध्ये आपल्या अभिनयाचा जलवा दाखवल्यानंतर नागा चैतन्य आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. लवकरच प्रदर्शित होत असलेल्या आमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटात नागा चैतन्य देखील दिसणार आहे. ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट 11 ऑगस्टला रिलीज होत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने आमिरची बॉक्स ऑफिसवर अक्षय कुमारशी स्पर्धा होणार आहे. याच दिवशी अक्षय कुमारचा ‘रक्षाबंधन’ देखील रिलीज होणार आहे.


हेही वाचा: