Rohit Shetty : रोहित शेट्टी (Rohit Shetty) बॉलिवूडचा लोकप्रिय सिने-दिग्दर्शक आहे. नुकताच अभिनेत्याचा 50 वा वाढदिवस पार पडला आहे. बॉलिवूडच्या बड्या दिग्दर्शकांच्या यादीत रोहित शेट्टीचा समावेश होतो. आज रोहित शेट्टी लोकप्रियतेच्या शिखरापर्यंत पोहोचला असला तरी हा प्रवास त्याच्यासाठी सोपा नव्हता. प्रचंड मेहनतीच्या जोरावर रोहित आज यशस्वी दिग्दर्शक झाला आहे. रोहित शेट्टीचा आजवरचा प्रवास खूपच संघर्षमय होता. मेहनतीच्या जोरावर रोहित शेट्टी आज वर्षाला कोट्यवधी रुपये कमवत आहे. रोहित शेट्टी आज एका चित्रपटाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये कमवत असला तरी त्याची पहिली कमाई फक्त 35 रुपये होती. रोहित शेट्टीच्या आगामी चित्रपटांची (Rohit Shetty Movies) चाहत्यांना उत्सुकता आहे.


वडिलांच्या निधनानंतर सर्वच बदललेलं


रोहित शेट्टीचे आई-वडील दोघेही इंडस्ट्रीमधलेच आहेत. रोहितच्या वडिलांचं नाव एमबी शेट्टी आहे. एमबी शेट्टी बॉलिवूडचे स्टंट दिग्दर्शक होते. तर आई रत्ना शेट्टी ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून काम करत असे. पण वडिलांच्या निधनानंतर रोहितचं आयुष्य पूर्णपणे बदललं. रोहित शेट्टी पाचवीत असताना त्याच्या वडिलांचं निधन झालं होतं. वडिलांच्या निधनानंतर रोहित शेट्टी आर्थिकरित्या खचला होता. गरीबीमुळे त्याला घरातील सामानदेखील विकावं लागलं होतं. 


रोहित शेट्टीची पहिली कमाई किती? 


रोहित शेट्टी एका मुलाखतीत म्हणाला होता की, त्याची पहिली कमाई फक्त 35 रुपये होती. 35 रुपये पहिली कमाई मिळाल्यानंतर त्या पैशांचं नक्की काय करावं हे रोहित शेट्टीला कळत नव्हतं. अनेक वर्षे मेहनत केल्यानंतर रोहितचे दिवस बददले आणि त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करायला सुरुवात केली. हळूहळू रोहित शेट्टीला चांगली कामे मिळू लागली. आज रोहित शेट्टी बॉलिवूडवर राज्य करताना दिसून येत आहे.


रोहित शेट्टीची नेटवर्थ किती? (Rohit Shetty Networth)


रोहित शेट्टीची पहिली कमाई 35 रुपये होती. पण आता तो महिन्याला कोट्यवधी रुपये कमावतो. सीएनॉलेज डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार, रोहित शेट्टीची एकूण संपत्ती 248 कोटींच्या आसपास आहे. वर्षाला रोहित शेट्टी 36 कोटी रुपये कमावतो. प्रत्येक महिन्याला तो तीन कोटींच्या आसपास कमाई करतो.


रोहित शेट्टीचा सिनेप्रवास (Rohit Shetty Movies) 


रोहित शेट्टीने 2003 मध्ये 'जमीन' या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात अजय देवगन मुख्य भूमिकेत होता. 'गोलमाल' सीरिजसह अजय देवगनचे 'ऑल द बेस्ट','सिंघम','चेन्नई एक्सप्रेस','सिम्बा','सूर्यवंशी' हे चित्रपटदेखील सुपरहिट ठरले आहे. रोहित शेट्टीचा 'सिंघम अगेन' हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 2025 मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


संबंधित बातम्या


Rohit Shetty : प्रेक्षकांना खळखळून हसवायला येतोय 'Golmaal 5'; रोहित शेट्टीचा खास मास्टरप्लॅन! जाणून घ्या कधी रिलीज होणार चित्रपट