Pushpa 2 Teaser Out : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) सध्या त्याच्या आगामी 'पुष्पा 2' (Pushpa 2) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त (Allu Arjun Birthday) आज 'पुष्पा 2'चा चित्रपटाचा धमाकेदार टीझर (Pushpa 2 Teaser Out) रिलीज करण्यात आला आहे. टीझरमध्ये अल्लू अर्जुनचा स्वॅग पाहायला मिळत आहे. टीझर रिलीज झाल्याने प्रेक्षकांची सिनेमाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे. 'पुष्पा : द राइज' (Pushpa: The Rise) हा चित्रपट 2021 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटातील अल्लू अर्जुनच्या कामाचं सर्वत्र कौतुक झालं. बॉक्स ऑफिसवरदेखील या चित्रपटाने चांगली कमाई केली. आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची अर्थात 'पुष्पा 2 : द रूल'ची (Pushpa 2 : The Rule) चाहत्यांना उत्सुकता आहे. 


अल्लू अर्जुन आज आपला 42 वा वाढदिवस साजरा करत आहे. अल्लू अर्जुनला सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. 'पुष्पा' (Pushpa) चित्रपटानंतर अल्लू अर्जुनचा चाहतावर्ग वाढला. आता दाक्षिणात्य सुपरस्टारच्या आगामी चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकता आहे. टीझर रिलीज करण्याआधी एक पोस्टर शेअर करण्यात आलं होतं. यात अल्लू अर्जुन 'पुष्पा'च्या अंदाजात दिसून आला होता. अल्लू अर्जुनच्या हातात कुऱ्हाड होती. 'पुष्पा' स्टाइलमध्ये तो सिंहासनावर बसलेला दिसून आला होता.


'पुष्पा 2'च्या टीझरमध्ये काय आहे? (Pushpa 2 Teaser Out) 


अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2'चा (Pushpa 2 The Rule Teaser) हा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारा आहे. पायात घुंगरू,  डोळ्यात आग, हातात त्रिशूल आणि अर्धनारीच्या लूकमध्ये 'पुष्पा'चा अॅक्शन अवतार पाहायला मिळत आहे. 'पुष्पा 2'चा टीझर पाहून 'फ्लावर नहीं फायर है' असं चाहते म्हणत आहे. हातात त्रिशूळ आणि शंख घेऊन तांडव करताना अल्लू अर्जुन पाहायला मिळत आहे.


'पुष्पा 2' कधी रिलीज होणार? (Pushpa 2 Release Date)


'पुष्पा 2' हा चित्रपट 15 ऑगस्ट 2024 रोजी रिलीज होणार आहे. 500 कोटींच्या बजेटमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. भारतातील बिग बजेट चित्रपटांमध्ये 'पुष्पा 2'चा समावेश असणार आहे. 'पुष्पा 2: द रूल' (Pushpa 2 : The Rule) हा 'पुष्पा : द राइज' (Pushpa : The Rise) या चित्रपटाचा सीक्वेल असणार आहे. आता हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर किती कोटींचा गल्ला जमवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अल्लू अर्जुनसोबत रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. तसेच फहद फासिल (Fahadh Faasil) खलनायकाच्या भूमिकेत झळकेल. 


Pushpa 2 The Rule Teaser : 



संबंधित बातम्या


Happy Birthday Allu Arjun : अल्लू अर्जुनचा वाढदिवस अन् 'Pushpa 2'च्या टीझरचा धमाका; पडद्यावरील पुष्पाची A to Z माहिती