12th Fail : '12 वी फेल' (12th Fail) हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा दणदणीत कमाई करत आहे. बॉक्स ऑफिस गाजवत असलेल्या या सिनेमाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. ऑस्कर (Oscar) नामांकनाच्या शर्यतीत आता या सिनेमाचा समावेश झाला आहे. 


विक्रांत मेस्सीची (Vikrant Messey) मुख्य भूमिका असलेला '12 वी फेल' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. प्रमोशन न करता हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज करण्यात आला आहे. आपल्या करिअरमध्ये अनेक आयकॉनिक सिनेमे बनवणारे विधू विनोद चोप्रा (Vidhu Vinod Chopra) यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. '12 वी फेल' या सिनेमाची निर्मिती कमीत कमी बजेटमध्ये करण्यात आली आहे. तसेच कमी स्क्रीन्सवर हा सिनेमा रिलीज करण्यात आला आहे. पण तरीही प्रेक्षकांनी हा सिनेमा डोक्यावर घेतला आहे. सर्वत्र या सिनेमाचं कौतुक सुरू आहे.


'12 वी फेल' या सिनेमातील विक्रांतच्या कामाने सर्वांना थक्क केलं आहे. या सिनेमाची गोष्ट खूपच भावनिक आहे. हा सिनेमा या वर्षातला सुपरहिट सिनेमा ठरला आहे. अजूनही बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा धमाकेदार कामगिरी करत आहे. आता ऑस्करच्या शर्यतीत सिनेमाचा समावेश झाल्याने या सिनेमाच्या कमाईत आणखी वाढ होईल. 


ऑस्करच्या शर्यतीत '12 वी फेल'


'12 वी फेल' या सिनेमाचा ऑस्करच्या शर्यतीत समावेश झाला आहे. आजतकसोबत बोलताना विक्रांतने स्वत: यासंदर्भात माहिती दिली आहे. ऑस्कर नामांकनांच्या शर्यतीत आता या सिनेमाचा समावेश झाल्याने चाहते आनंद व्यक्त करत आहेत. 


विक्रांत म्हणाला की,"12 वी फेल' हा सिनेमा प्रेक्षकांना नक्की आवडेल यावर आमचा विश्वास होता. पण प्रेक्षकांचा या सिनेमाला मिळणारा प्रतिसाद ही आमच्यासाठी नक्कीच आनंददायी गोष्ट आहे. अनेक प्रेक्षक दुसऱ्यांदा-तिसऱ्यांदा हा सिनेमा पाहायला येत आहेत. प्रेक्षकांना फक्त मनोरंजन नको आहे तर उत्तम कथानकही हवं आहे हे यावरुन सिद्ध होतं". 


'12 वी फेल' सिनेमाबद्दल जाणून घ्या... (12th Fail Movie Details)


'12 वी फेल' हा सिनेमा 27 ऑक्टोबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. विक्रांत मेस्सी आणि मेधा शंकर या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने 45 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. अनुराग पाठक यांच्या पुस्तकावर आधारित हा सिनेमा आहे. आयपीएस मनोज कुमार यांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे. 


संबंधित बातम्या


12th Fail And Tejas Box Office Collection: विक्रांत मेस्सीच्या '12th फेल' नं केली बंपर कमाई; कंगनाच्या 'तेजस' ला टाकलं मागे; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन....