Rocky Aur Rani Ki Prem Kahani:  अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला.'रॉकी और रानी की प्रेम कहानी'

  हा चित्रपट 28 जुलै 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाच्या टीझरमधील कलाकारांच्या अभिनयानं अनेकांचे लक्ष वेधले. या चित्रपटासाठी कलकारांनी किती मानधन घेतलं असेल? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला असेल. जाणून घेऊयात 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटासाठी कलाकारांनी घेतलेल्या मानधनाबाबत...


अभिनेत्री आलिया भट्टनं रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटात राणीची भूमिका साकारली आहे. एका रिपोर्टनुसार, आलियाने या चित्रपटासाठी 10 कोटी रुपये मानधन घेतलं आहे. 






रणवीर सिंहचा सर्कस हा चित्रपट फ्लॉप ठरला. आता तो रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात तो रॉकी ही भूमिका साकारणार आहे. या चित्रपटासाठी रणवीरनं 25 कोटी मानधन घेतलं आहे.






ज्येष्ठ  अभिनेत्री जया बच्चन आणि शबाना आजमी यांनी रॉकी और रानी की प्रेम कहानी  या चित्रपटासाठी एक कोटी रुपये फी घेतली आहे. या चित्रपटात शबाना आजमी यांनी  आलिया भट्टच्या आईची भूमिका साकारली आहे. 


बॉलिवूडमध्ये ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र हे आपल्या अभिनयानं नेहमी प्रेक्षकांची मनं जिंकत असतात. आता रॉकी और रानी की प्रेम कहानी  या चित्रपटामधील धर्मेंद्र यांचा अभिनय पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. या चित्रपटासाठी धर्मेंद्र यांनी एक कोटी मानधन घेतलं आहे. 


'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात  रंधवा आणि चॅटर्जी या दोन कुटुंबाची गोष्ट दाखवण्यात येणार आहे.  या चित्रपटाचं दिग्दर्शन करण जोहरनं केलं आहे. प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

संबंधित बातम्या


Rocky Aur Rani Ki Prem Kahani: चित्रपट आलिया, रणवीरचा पण चर्चा मात्र 'या' व्यक्तीची; 'रॉकी और रानी...'च्या टीझरला कमेंट करुन नेटकऱ्यांनी केलं 'या' व्यक्तीचं कौतुक