Tamannaah Bhatia And Vijay Varma: गेल्या काही दिवसांपासून अभिनेता विजय वर्मा (Vijay Varma) आणि अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) यांच्या अफेअरची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. तमन्ना आणि विजय हे नेटफ्लिक्सवरील (Netflix) लस्ट स्टोरीज-2 ( Lust Stories 2) या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. या चित्रपटामध्ये तमन्ना आणि विजय यांचे काही इंटिमेट सीन्स प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत. या  इंटिमेट सीन्सच्या शूटिंगबाबत एका मुलाखतीमध्ये तमन्नानं सांगितलं की, 'विजयसोबत  इंटिमेट सीन्सचं शूटिंग करत असताना मला सुरक्षित वाटले.'


एका मुलाखतीमध्ये तमन्नानं लस्ट स्टोरीज-2 चित्रपटातील विजयसोबतच्या इंटिमेट सीन्सच्या शूटिंगबाबत सांगितलं,  'एखाद्या अभिनेत्यासोबत काम करताना मला इतके सुरक्षित कधीच वाटले नाही आणि ही गोष्ट एका अभिनेत्यासाठी खूप महत्त्वाचे असते. तुम्हाला काम करताना अशा प्रकारची सुरक्षितता जाणवली पाहिजे,  विशेषतः अशा चित्रपटात. त्याच्यामुळे मला इतके सुरक्षित वाटले की, त्या सीनमध्ये मी काही बोलण्यास, काहीही करण्यास, विशिष्ट प्रकारे भावना व्यक्त करण्यास घाबरले नाही. त्याने मला हे सर्व सोपे करुन दिले. त्यामुळे ही त्याची गोष्ट मला नक्कीच आवडणारी आहे.'






विजय वर्मा आणि  तमन्ना भाटिया यांचा लस्ट स्टोरीज-2 या चित्रपटाची रिलीज डेट अजून जाहीर करण्यात आलेली नाही. या चित्रटाचा टीझर आणि ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला. या ट्रेलर आणि टीझरला प्रेक्षकांची पसंती मिळाली. लस्ट स्टोरीज-2 च्या ट्रेलर आणि टीझरमध्ये देखील तमन्ना आणि विजयच्या इंटिमेट सीन्सची धलक बघायला मिळते. 


आर बाल्की, सुजॉय घोष, अमित रविंदरनाथ शर्मा आणि कोंकणा सेन शर्मा या चार दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेल्या कथा लस्ट स्टोरीज-2 या चित्रपटात दाखवण्यात येणार आहेत.  लस्ट स्टोरीज-2 मध्ये विजय वर्मा आणि  तमन्ना भाटिया यांच्यासोबतच काजोल, तिलोतमा शोम, अमृता शुभाश, अंगद बेदी, कुमुद मिश्रा, मृणाल ठाकूर आणि नीना गुप्ता या कलाकरांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Lust Stories 2 Trailer release: 'लस्ट स्टोरीज-2' चा ट्रेलर आला प्रेक्षकांच्या भेटीस; तमन्ना आणि विजय वर्माच्या केमिस्ट्रीनं वेधलं लक्ष