Rocky Aur Rani Ki Prem Kahani:  अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky Aur Rani Ki Prem Kahani)  या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या टीझरमध्ये भव्य सेट, चित्रपटातील तगडी स्टार कास्ट आणि कलाकारांचे इमोशन्स यांची झलक बघायला मिळत आहे. पण 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'  या चित्रपटाचा टीझर रिलीज होताच एका व्यक्तीचं कौतुक नेटकरी सोशल मीडियावर  करत आहेत. तो व्यक्ती कोण आहे? याबाबत जाणून घेऊयात...


'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाचा टीझर करण जोहरनं सोशल मीडियावर शेअर केला. तसेच धर्मा मुव्हीज या युट्यूब चॅनलवर देखील या चित्रपटाचा टीझर शेअर करण्यात आला आहे. युट्यूबवर शेअर करण्यात आलेल्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाच्या टीझरला कमेंट करुन अनेक नेटकऱ्यांनी गायक अरिजित सिंहचं कौतुक केलं आहे. 


'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाच्या टीझरच्या शेवटी अरिजितच्या आवाजातील गाणे ऐकू येते. युट्यूबवर शेअर करण्यात आलेल्या या टीझरला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'कोणताही चित्रपट हा चित्रपट अरिजित सिंहगच्या (Arijit Singh) गाण्याशिवाय अपूर्ण आहे.' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'टीझरमध्ये अरिजितचा आाज ऐकून अंगावर शहारे आले.'








'रॉकी और रानी की प्रेम कहानी'  या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर करुन आलियानं त्याला कॅप्शन दिलं,'कहानी तो बस शुरू हुई है अभी…' तर करणनं हा टीझर शेअर करुन लिहिलं, "रॉकी और रानी की प्रेम काहानी' या माझ्यासाठी अत्यंत खास असणाऱ्या चित्रपटाची झलक तुम्हाला दाखवत आहे."






'रॉकी और रानी की प्रेम कहानी'   हा चित्रपट 28 जुलै 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटात आलिया आणि रणवीर यांच्यासोबतच जया बच्चन, धर्मेंद्र, क्षिती जोग, शबाना आझमी हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत.  'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात  रंधवा आणि चॅटर्जी या दोन कुटुंबाची गोष्ट दाखवण्यात येणार आहे. 


संबंधित बातम्या


Shah Rukh Khan: 'तुझे वडील...'; 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'चा टीझर रिलीज होताच शाहरुखनं करण जोहरसाठी केलं खास ट्वीट