Riteish Deshmukh Poll On India Vs Bharat : जी-20 (G-20) निमंत्रण पत्रिकेवर भारत (Bharat) नाव लिहिलं गेलं आणि देशाचं नाव बदलणार असल्याची चर्चा सुरू झाली. मोदी सरकार देशाचं नाव इंडिया ऐवजी भारत करणार असल्याचं म्हटलं जात आहे. एकीकडे याप्रकरणी विरोधक आक्रमक झाले असून विविध स्तरातून या प्रकरणी प्रतिक्रिया उमटत आहे. अशातच अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) याने ट्विस्टरवरुन देशाचं नाव बदलण्याबाबत एक पोल घेतला आहे. 


मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखने 'तुम्हाला काय वाटतं' असं म्हणत ट्विटरवरुन देशाचं नाव बदलण्याबाबत पोल घेतला आहे. या पोलमध्ये त्याने 1. भारत, 2. इंडिया, 3. हिंदुस्थान आणि 4. सगळे सारखेच आहेत, असे चार पर्याय दिले आहेत. रितेशच्या या पोलला चाहत्यांना 24 तासांसाठी वोट करण्यात येणार आहे. आतापर्यंत या पोलला 26,682 लोकांनी वोट केलं आहे.


चाहत्यांचा कौल कोणाला? 


26,682 लोकांपैकी भारत या पर्यायाला 28.8% लोकांनी वोट केलं आहे. तर इंडियाला 23.9% टक्के लोकांनी वोट केलं आहे. तसेच हिंदुस्थान या पर्यायाला फक्त 4.1% चाहत्यांनी वोट केलं आहे. तसेच सगळे सारखेच आहेत या पर्यायाला सर्वाधिक वोट्स मिळाले आहेत. 43.2% लोकांनी या पर्यायाला आपली पसंती दर्शवली आहे.






नेमकं प्रकरण काय? 


राजधानी दिल्लीत जी 20 (G 20) परिषदेची तयारी सुरू आहे. या जी-20 डिनरच्या निमंत्रण पत्रिकेवर 'प्रेसिडेंट ऑफ इंडिया' (President Of India) ऐवजी 'प्रेसिडेंट ऑफ भारत' (President Of Bharat) असे लिहिलेले आहे. त्यामुळे देशाचं नाव इंडिया ऐवजी भारत करणार असल्याची शंका काँग्रेसला आली. त्यानंतर एकीकडे काँग्रेस आक्रमक झाली तर दुसरीकडे इंडियाचा उल्लेख भारत करावा, अशी संपूर्ण देशाची मागणी असल्याचं भाजप नेत्यांनी म्हटलं. 


रितेश देशमुखआधी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, कंगना रनौत, विष्णु विशाल, जॅकी श्रॉफ या सेलिब्रिटींनीही जी-20 डिनर निमंत्रण पत्रिकेवर 'प्रेसिडेंट ऑफ इंडिया' (President Of India) ऐवजी 'प्रेसिडेंट ऑफ भारत' (President Of Bharat) असे लिहिल्याबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे. 










संबंधित बातम्या


Kangana Ranaut : G-20 निमंत्रण पत्रिकेवरुन कंगना रनौतचं ट्वीट; म्हणाली,"आपण भारतीय आहोत...इंडियन नाही"