'रातोरात माझे केस राखाडी/पांढरे झाल्यामुळे ज्या काही अफवा माझ्याबाबत फिरत आहेत, त्या स्पष्ट करत आहे. हनी त्रेहान आणि सोनी पिक्चर्सची निर्मिती असलेल्या एका सिनेमासाठी अॅवन काँट्रॅक्टरने माझे केस रंगवले आहेत. हितेश भाटिया दिग्दर्शित या चित्रपटाचं नाव अजून ठरलेलं नाही.' असं ऋषी कपूर यांनी ट्वीट केलं आहे.
ऋषी कपूर यांनी या चित्रपटातील आपला लूकही शेअर केला आहे. 'हा चित्रपटातील फायनल लूक आहे. शर्मा जी. लवकरच केसांचा मूळ रंग परत दिसेल' असंही ऋषी कपूर यांनी लिहिलं आहे.
ऋषी कपूर यांच्या मातोश्री कृष्णा राज कपूर यांचं गेल्याच आठवड्यात निधन झालं. त्यावेळी ऋषी कपूर पत्नी नितू सिंग यांच्यासह उपचारांसाठी न्यूयॉर्कला होते.