मुंबई : अभिनेते ऋषी कपूर यांनी  पुन्हा एकदा गांधी कुटुंबावर हल्ला चढवला आहे. रस्त्यांपासून-विमानतळांपर्यंत बहुतेक ठिकाणी गांधी घराण्याचं नाव आहे. त्यामुळे दोन दिवसांपूर्वीच ट्विटास्त्र सोडलेल्या ऋषी कपूर यांनी पुन्हा एकदा ट्विटची मालिका उघडली.


 

यावेळी त्यांनी एकट्या दिल्ली शहरात गांधी कुटुबांची 64 ठिकाणांना नावं असल्याचं निदर्शनास आणलं आहे. त्याची खरंच गरज आहे का? असा सवाल ऋषी कपूर यांनी विचारला आहे. यावेळी ऋषी कपूर यांनी विविध ठिकाणांना गांधी घरण्यांची नावं असलेला फोटो शेअर केला आहे.


 

यापूर्वी केलेल्या ट्विटमधूनही ऋषी कपूर यांनी काँग्रेसवर हल्ला चढवला होता. देशातील महत्त्वाची ठिकाणं, संस्था, रस्ते यांना गांधी कुटुंबातील सदस्यांची नावं दिल्याबद्दल त्यांनी आक्षेप नोंदवला होता.

 

यापूर्वी केलेल्या ट्विटमध्ये ऋषी कपूर म्हणाले होते, “बहुतेक संपत्तीवर गांधी कुटुंबाचं नाव का आहे? इंदिरा गांधी एअरपोर्टचं नाव गांधींच्या नावावर का आहे? याचं नाव भगत सिंह, आंबेडकरही ठेवता आलं असतं, किंवा ऋषी कपूरही.”

 

काँग्रेस सरकारच्या काळात गांधी कुटुंबावर ठेवलेली नावं बदलली जावीत. वांद्रे-वरळी लिंकचं नाव लता मंगेशकर किंवा जेआरडी टाटांच्या नावावर ठेवा. बाप का माल समज रखा है क्या?, असंही ट्विट ऋषी कपूर यांनी केलं होतं.

संबंधित बातमी


बाप का माल समज रखा था?, गांधी कुटुंबावर ऋषी कपूर यांची आगपाखड