मुंबई : अवघ्या महाराष्ट्राला याड लावणारा नागराज मंजुळेचा 'सैराट' बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. सिनेमाने आतापर्यंत 60 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. त्यामुळेच की काय सिनेमातील सहजसुंदर अभिनयाने सर्वांचं मन जिंकणाऱ्या आर्ची-परशा अर्थात रिंकी राजगुरु आणि आकाश ठोसरला यांना भरगच्च बोनस मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे.     बॉक्स ऑफिसवर 'सैराट'ने नुकताच 60 कोटींचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे या दोन्ही कलाकारांना प्रत्येकी पाच कोटींचा बोनस देण्यात येणार आहे. 'मुंबई मिरर'मध्ये हे वृत्त प्रकाशित झालं आहे.     परंतु आम्ही झी स्टुडिओशी संपर्क साधला असताना त्यांनी हे वृत्त फेटाळलं आहे. बोनस देण्याबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचं 'झी स्टुडिओ'तर्फे सांगण्यात आलं.     'सैराट'च्या अभूतपूर्व यशानंतर व्हॉट्सअॅप आणि फेसबुक यांसारख्या सोशल मीडियावर अफवांचा बाजार रंगत आहे.   मराठी चित्रपटसृष्टीत आतापर्यंत कोणत्याही अभिनेता किंवा अभिनेत्रीला कोणत्याही सिनेमासाठी एवढं मानधन मिळालं नव्हतं. सध्या अप्रेझलचा मोसम सुरु आहे, त्यात सिनेस्टारही कसे मागे राहतील. त्यामुळे रिंकू आणि आकाशसाठी हा बंपर बोनस ठरला आहे.   मध्यरात्रीही 'सैराट'चे शो नागराज मंजुळेचा 'सैराट' सिनेमा मराठी चित्रपटसृष्टीतील मैलाचा दगड ठरत आहे. साताऱ्यात 'सैराट'वेड्या चाहत्यांसाठी सिनेमाचे मध्यरात्री 12 वाजता आणि पहाटे 3 वाजताही शो सुरु होते. चित्रपटाचं प्रमोशन झालं होतं, परंतु माऊथ पब्लिसिटीनेही सिनेमाच्या कमाईत आणखी भर पडली. त्यामुळेच 21 दिवसात 60 कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली आहे.     चार लाख नाही तर पाच कोटी देणार खरंतर सुरुवातीला रिंकू आणि आकाशला 4 लाख रुपयांना साईन करण्यात आलं होतं. पण आता त्यांना प्रत्येकी 5 कोटी रुपये देणार असल्याची घोषणा एस्सेल व्हिजन प्रॉडक्शनचे सीईओ नितीन केणी आणि 'झी स्टुडिओ'चे बिझनेस हेड निखिल साने यांनी केली. चित्रपट बनवण्याचा खर्च 4 कोटींपर्यंत गेला होता. बोनस फक्त सिनेमातील मुख्य कलाकारांनाच नाहीत तर इतरांनाही काही रक्कम देणार असल्याचं केणी यांनी सांगितलं. यासंबंधी काम सुरु असून लवकरच त्यांना पैसे देण्यात येतील, असंही केणी म्हणाले. मुंबई उपनगरात मागील आठवड्यात 'कॅप्टन अमेरिका : सिव्हिल वॉर'चे तीन शो, 'अझहर'चे तीन शो आणि 'सैराट'चे आठ शो असल्याचं सांगताना केणी यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता.     चाहत्यांच्या प्रतिसादामुळे 'सैराट'चे शो वाढवले 29 एप्रिल रोजी 'सैराट' राज्यभरातील 400 थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. मात्र दुसऱ्या आठवड्यात सिनेमाचे शो 8500 ते 14,000 पर्यंत वाढले. इतकंच नाही साताऱ्यात मध्यरात्री 12 आणि पहाटे 3 चा शोही सुरु होता. 'सैराट'चं हे यश सगळ्यांनाच आश्चर्यचकित करणारं होतं. मराठी सिनेमात हे पहिल्यांदाच घडत होतं, असं नितीन केणी यांनी सांगितलं.     अजय-अतुलच्या संगीताची जादू नितीन केणी म्हणाले की, सिनेमाचं आणखी एक बलस्थान म्हणजे गाणी. अजय-अतुलच्या संगीताने चाहत्यांना अक्षरश: झिंग आणली. चित्रपटाची गाणी अमेरिकेच्या लॉस एंजलिसमधील सोनी थिएटरमध्ये 100 वाद्य आणि म्युझिशियन्सच्या मदतीने रेकॉर्ड करण्यात आली. अजय-अतुलला अमेरिकेत पाठवण्याचा खर्च 6-70 लाख रुपये होता.     तेलुगू, गुजराती आणि हिंदीत रिमेक मराठीमध्ये भरघोस प्रतिसाद मिळाल्यानंतर आम्ही 'सैराट'चा तेलुगू रिमेक करण्याचा विचार करत आहोत. यानंतर गुजराती आणि हिंदी व्हर्जनही करण्यात येईल. मात्र सिनेमाचा सिक्वेल करण्याचा कोणताही कोणताही विचार नाही, असंही नितीन केणी यांनी बोलून दाखवलं.  

संबंधित बातम्या :

'सैराट' चित्रपटाची टीम उद्धव ठाकरेंच्या भेटीला मातोश्रीवर

आर्ची-परशा आता गुजराती-तेलुगूत, ‘सैराट’चा लवकरच रिमेक

आर्ची-परशाचं खरं फेसबुक पेज कोणतं?

नाशकात प्रेक्षकांची हुल्लडबाजी, आर्ची-परशाचा काढता पाय

‘सैराट’नं रचला इतिहास… तुफानी कमाई, झिंगाट सेलिब्रेशन!

‘सैराट’च्या शिरपेचात मानाचा तुरा, जगप्रसिद्ध ‘फोर्ब्स’कडून दखल

‘त्या’ संवादामुळे प्रणिता पवार यांची नागराज मंजुळेंना नोटीस

इमारतीच्या जिन्यात चाहत्यांचा गराडा, ‘सैराट’ टीमला…

आपल्याकडे जगणं नाही, पण सिनेमे गांभीर्यानं घेतात

रिंकू राजगुरु आंतरजातीय विवाह योजनेची ब्रँड अँबेसेडर?

नाराज परशाचं चाहत्यांना आवाहन

डॅशिंग आर्चीला मुख्यमंत्र्यांचा पहिला प्रश्न…..

‘सैराट’ची रेकॉर्डब्रेक कमाई, 11 दिवसात ‘नटसम्राट’ला धोबीपछाड

“नाग्या, तुझी कला जखमेतून येतेय. ती जखम भळभळत राहो.”

सोलापूरच्या नागराज मंजुळेची बॉलिवूडमध्ये काय चर्चा?

“हॅलो, आर्ची अभिनंदन’!, अहो मी आर्ची नाही, उद्योगमंत्री बोलतोय”

सांगलीत ‘आर्ची’च्या झिंगाट चाहत्यांवर लाठीमार

रिव्ह्यू : याड लावणारा ‘सैराट’