Rinku Rajguru : 'सैराट' (Sairat) फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. अभिनेत्रीने नुकतीच 'मराठी फिल्मफेअर अवॉर्ड 2024'ला (Filmfare Award Marathi 2024) हजेरी लावली होती. दरम्यान आर्चीच्या बोल्ड लूकने इंटरनेटचा पारा वाढला. सध्या तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तिच्या लूकची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. 


'मराठी फिल्मफेअर अवॉर्ड 2024'मध्ये रिंकू राजगुरूचा कधीही न पाहिलेला बोल्ड अंदाज पाहायला मिळाला. लाडक्या आर्चीने कलरफुल डिप नेक असलेला गाऊन परिधान केला होता. तिच्या या इंद्रधनुष्य लूकने चाहत्यांचं चांगलच लक्ष वेधून घेतलं. कलरफुल गाऊनचा लूक आणखी खास करण्यासाठी अभिनेत्रीने हातात अंगठी आणि हिऱ्याचा नाजुक हार आणि कानातले परिधान केले होते. 


रिंकू राजगुरूच्या फोटोंवर चाहत्यांचा कमेंट्सचा वर्षाव


रिंकू राजगुरूच्या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. म्हटलं ना इंद्रधनुष्य, नुसतं बघतंच राहावंसं वाटतं, किती सुंदर दिसत आहेस, शरीर प्रदर्शन केल्याशिवाय जमतच नाही वाटतं, मराठी पाऊल पडते पुढे, यापेक्षा सैराटमधील आर्चीचा लूक जबरदस्त होता, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, आर्चीची सनी लिओनी व्हायला वेळ नाही लागणार, शरीर प्रदर्शन करून पुढे जाण्यात काहीच अर्थ नाही, पोरगी गावठी होती तेच बरं होतं, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. चाहत्यांनी अभिनेत्रीच्या बोल्ड लूकचं कौतुक केलं असलं तरी नेटकऱ्यांना मात्र तिचा हा लूक आवडलेला नाही. त्यामुळे आर्चीला ट्रोल करायला नेटकऱ्यांनी सुरुवात केली आहे.






रिंकू राजगुरू सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा ती प्रयत्न करत असते. नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' या चित्रपटाच्या माध्यमातून रिंकूने अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवलं. उत्कृष्ट अभिनय आणि हसरा चेहरा, सौंदर्याच्या जोरावर तिने इंडस्ट्रीत स्वत:चं स्थान निर्माण केलं आहे. आता अभिनेत्रीचे आगामी कलाकृतींची चाहत्यांना उत्सुकता आहे.


फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात बोल्ड लूक करणं रिंकू राजगुरूला चांगलच महागात पडलं आहे. रिंकू राजगुरूचं खरं नाव प्रेरणा असं आहे. 'सैराट' या चित्रपटाने तिला रातोरात सुपरस्टार केलं. या चित्रपटातील तिचा अभिनय चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरला होता. 'सैराट'सह रिंकूने कागर, मेकअप, झुंड, झिम्मा 2 या सुपरहिट चित्रपटांतही काम केलं.


संबंधित बातम्या


Rinku Rajguru : तुमची मुलगी असती तर तुम्हाला चाललं असतं का? भर कार्यक्रमातून बाहेर जाताना आर्ची चाहत्यांवर भडकली