Rinku Rajguru : अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'सैराट' (Sairat) या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून ती रातोरात सुपरस्टार झाली. या चित्रपटाने तिने साकारलेली 'आर्ची' (अर्चना पाटील) ही भूमिका चांगलीच गाजली. तिच्या या भूमिकेचं आजही कौतुक होतं. रिंकू राजगुरूने वयाच्या 16 व्या वर्षी रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. रिंकूचा पहिलाच चित्रपट 'सैराट' भारतीय सिनेसृष्टीत ब्लॉकबस्टर ठरला.


'सैराट' या मराठी चित्रपटानंतर रिंकू राजगुरू हिंदी सिनेविश्वातही झळकली. या चित्रपटानंतर 16 वर्षांच्या आर्चीने आपल्या लूक्सवर आणि फिटनेसवर खूप मेहनत घेतली आहे. 'सैराट' चित्रपटानंतर रिंकू राजगुरूने आपल्या स्टाईल आणि फॅशन लूक्समध्ये खूप मेहनत घेतली. रिंकू सध्या वर्कआऊटचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. 


'असा' मिळालेला रिंकूला 'सैराट'


'सैराट' हा चित्रपट रिंकू राजगुरूला खूप नाट्यमय पद्धतीने मिळाला आहे. नागराज मंजुळे काही कामासाठी अकलूजला गेले होते. त्यावेळी रिंकू राजगुरूला पाहिल्यानंतर त्यांनी तिला चित्रपटासाठी ऑफर दिली. रिंकूने पुढे 10 मिनिटांची ऑडिशन दिली. काही दिवसांतच  तिची या चित्रपटासाठी निवड झाली.






रिंकू राजगुरूची कौटुंबिक पार्श्वभूमी


रिंकू राजगुरूचा जन्म 3 जून 2001 रोजी झाला आहे. महाराष्ट्रातील अकलूज येथील एका सामान्य कुटुंबात रिंकूचा जन्म झाला आहे. रिंकूचे आई-वडील उषा आणि महादेव दोघेही हाडाचे शिक्षक आहेत. रिंकूच्या आई-वडिलांना नृत्य आणि गायनात रस आहे. त्यामुळे रिंकूलादेखील लहानपणापासून कलेची आवड निर्माण झाली. आई-वडिलांच्या पाठिंब्यामुळेच रिंकूने स्वत:ला सिद्ध केलं आहे. त्यांच्यामुळे रिंकूने अभिनयक्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. 


'सैराट'नंतर रिंकूचा बोलबाला 


'सैराट' या चित्रपटानंतर रिंकू राजगुरूने अनेक इमेज ब्रेक करणाऱ्या भूमिका निभावल्या. अल्पावधीतच तिला मराठीसह बॉलिवूडच्या अनेक बड्या दिग्दर्शकांसोबत काम केलं. मिळालेल्या संधीचं रिंकूने सोनं केलं. आर्चीच्या भूमिकेनंतर रिंकूने विविध चित्रपटांत दमदार भूमिका साकारल्या. कागर, मेकअप आणि अनपॉज्ड सारख्या चित्रपटांत ती झळकली. हँड्रेड डेज या वेबसीरिजमध्येही तिने काम केलं. रिंकू राजगुरूचे सैराट, मनसू मल्लिंगे, कागर, मेकअप, 200 हल्ला हो, अनकहीं कहानियां, झुंड, अनपॉज्ड या चित्रपटांमध्ये रिंकूने काम केलं आहे.


संबंधित बातम्या


Sairat : नागराज मंजुळेंचा 'सैराट' आठ वर्षांचा झाला जी! रिंकूने शेअर केले आर्ची-परश्याचे तुम्ही कधीही न पाहिलेले फोटो