Tanmay Bhatt Richest Indian Youtuber : पैसे कमावणं आणि श्रीमंत होणं हे प्रत्येकाचंच स्वप्न असतं. पैसे कमावण्यासाठी प्रत्येक जण मेहनत घेत असतो. मेहनतीचं यश त्याला मिळतंच. देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींचा जेव्हा उल्लेख केला जातो तेव्हा अंबानी कुटुंबियांचं नाव घेतलं जातं. पण ओटीटी विश्वात रमणारा एक युट्यूबर मात्र कमाईच्या बाबतीत बड्या-बड्या विनोदवीरांना टक्कर देतो. या युट्यूबरचं नाव तन्मय भट्ट (Tanmay Bhatt) असं आहे. वेल्थ मॅनेजमेंटने आता भारतातील सर्वात महागडा युट्यूबर कोण हे जाहीर केलं आहे. त्यानुसार तन्मय भट्ट हा देशातील सर्वात महागडा युट्यूबर असल्याचं समोर आलं आहे.


विनोदवीर आणि कॉन्टेंट क्रिएटर तन्मय भट्टची एकूण संपत्ती वेल्थ मॅनेजमेंटने जाहीर केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, तन्मय भट्टची एकूण संपत्ती 650 कोटींपेक्षा अधिक आहे. तन्मयची संपत्ती ही भारतातील कोणत्याही कॉन्टेंट क्रिएटरच्या कमआईपेक्षा जास्त आहे. या रिपोर्टमध्ये अन्य कॉन्टेंट क्रिएटर्सच्या संपत्तीचादेखील खुलासा करण्यात आला आहे. भुवन बामची एकूण संपत्ती 122 कोटी रुपये आहे. कॅरी मिनाटीची एकूण संपत्ती 50 कोटी रुपये आहे. टेक्निकल गुरुजीची 365 कोटी, रणवीर इलाहाबादियाची 58 कोटी रुपये आहे. 






तन्मय भट्टची प्रतिक्रिया समोर


तन्मय भट्टची प्रतिक्रियादेखील समोर आली आहे. तन्मय म्हणाला,"नेटवर्थची ही संख्या खूपच कमी आहे. माझ्यासाठी तरी कमी आहे". पुढे त्याने हासण्याचा इमोजी शेअर केला आहे. तन्मय भट्टचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. 


कपिल शर्मा किती कमावतो? 


कपिल शर्मा देशातील सर्वात लोकप्रिय विनोदवीर आहे. मीडिया रिपोर्टनुसार, कपिल शर्माची एकूण संपत्ती 3.5 कोटी डॉलर आहे. गेल्या पाच वर्षात कपिलच्या संपत्तीत 380 टक्क्यांची वाढ झाली आहे. कपिलने 2007 मध्ये लाफ्टर चॅलेंज जिंकत 10 लाख रुपये आपल्या नावावर केले होते. त्यानंतर कपिलने कधीही मागे वळून पाहिलं नाही. आज देशातील सर्वात मोठा विनोदी कार्यक्रम 'द कपिल शर्मा' तो होस्ट करत आहे.


तन्मय भट्ट एक भारतीय YouTuber, विनोदकार, पटकथा लेखक, अभिनेता, कलाकार आणि निर्माता आहे. ते गुर सिमरनजीत सिंह खंबा यांच्यासह ऑल इंडिया बकचोड या क्रिएटिव्ह एजन्सीचे सह-संस्थापक आणि माजी सीईओ होते. 2018 मध्ये, Amazon Prime वर प्रसारित होणाऱ्या कॉमिकस्टान या स्टँड-अप कॉमेडी स्पर्धेच्या सीझन 1 मध्ये ते न्यायाधीश होते.