Dharmendra : "बसंती इन कुत्तों के सामने मत नाचना..." हा डायलॉग ऐकल्यानंतर तुम्हाला सुपरस्टार धर्मेंद्रची (Dharmendra) आठवण येत असेल. बॉलिवूडच्या सर्वात सुपरहिट चित्रपटांमध्ये एक असलेल्या 'शोले'मध्ये धर्मेंद्रने हेमा मालिनीला हा डायलॉग म्हटला आहे. धर्मेंद्रला बॉलिवूडचा 'हीमॅन' असं म्हटलं जातं. धर्मेंद्रने आपल्या सिनेसृष्टीतील कारकिर्दीत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 90 च्या दशकात बॉलिवूडच्या महागड्या अभिनेत्यांमध्ये धर्मेंद्रचा समावेश होत असे. आजही धर्मेंद्रचा मोठा चाहतावर्ग आहे. धर्मेंद्रच्या चित्रपटांची चाहते प्रतीक्षा करत असतात. अशातच आता धर्मेंद्रच्या काही न पाहिलेल्या फोटोंचं कलेक्शन समोर आलं आहे. या फोटोंमध्ये अभिनेता कलाकारांसोबत तसेच कुटुंबियासमवेत दिसत आहे. पण धर्मेंद्र आणि हेमा मालिनी (Hema Malini) यांच्या फोटोने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची ऑफस्क्रीन आणि ऑनस्क्रीन जोडी चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची चांगली मैत्री झाली. ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न केलं. धर्मेंद्र-हेमा मालिनी यांनी संसार थाटावा अशी दोघांच्याही चाहत्यांची इच्छा होती. आता धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात धर्मेंद्र आपली पूर्वाश्रमीची पत्नी प्रकाश कौरसोबतही दिसत आहे. तसेच सनी देओल आणि बॉबी देओलसोबतही एका फोटोत दिसत आहे.
धर्मेंद्रचं 75 फोटोंचं कलेक्शन सध्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. यात धर्मेंद्र तरुण दिसत आहेत. एका फोटोत ते आपल्या वडिलांसोबत दिसत आहेत. तर काही फोटोंमध्ये तो दिलीप कुमारसोबतही दिसत आहे. एक फोटो 'धर्मवीर' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा आहे. यात तो आपल्या खास गेटअपमध्ये बॉबी देओलसोबत दिसत आहे. तसेच बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबतचादेखील एक फोटो आहे. अनेक हिट चित्रपटांमध्ये दोघांनी एकत्र काम केलं आहे.
हेमा मालिनी अन् धर्मेंद्रच्या फोटोने वेधलं लक्ष
धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या फोटोने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. दोघांचेही करिअर पीकवर असताना त्यांनी हा फोटो काढला होता. एका फोटोमध्ये धर्मेंद्र हेमा मालिनी यांच्या गळ्यात हात टाकताना दिसून येत आहेत. दोघांच्या तरुणपणीचा हा फोटो पाहून चाहते सुपरस्टार जोडीचं खूप कौतुक करताना दिसून येत आहेत.
संबंधित बातम्या