मुंबई : सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणाशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर अभिनेत्री रिया चक्रवर्ती तुरुंगातून सुटका झाली आहे. प्रदीर्घ चौकशीनंतर एनसीबीने 8 सप्टेंबरला रिया चक्रवर्ती यांना अटक केली. तेव्हापासून रिया मुंबईच्या भायखळा कारागृहात न्यायालयीन कोठडीत होती. कोर्टाच्या आदेशानंतर भायखळा कारागृहाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. लेडी अधिकारी देखील तैनात होते.

Continues below advertisement




सुशांतसिंग राजपूतचे सहकारी दीपक सावंत आणि सॅमुअल मिरांडा यांनाही हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे. मात्र, ड्रग्ज प्रकरणात अटक झालेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविकची जामीन याचिका कोर्टाने फेटाळून लावली.


Drug Case | रिया चक्रवर्तीला हायकोर्टाचा दिलासा; जामीन मंजूर


मुंबई उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की एनसीबीने रियाकडून ड्रग्ज जप्त केले नाहीत. तसेच सुशांतसिंग राजपूतच्या घरातही ड्रग्ज मिळालेले नाही. अशा परिस्थितीत रियावर ड्रग्जची व्यावसायिक खरेदी-विक्री करत असल्याला कोणताही आधार नाही. मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान एनसीबीने जामिनास विरोध केला होता.


काय आहे अटी?
रिया चक्रवर्तीला एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर रियाचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. परंतु, एनसीबीकडे पासपोर्ट जमा करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. तसेच सुटकेनंतर दहा दिवस जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावावी आणि कोर्टाच्या परवानगीशिवाय देशाबाहेर जाऊ नये, असे आदेश उच्च न्यायालयाने रियाला दिले आहेत.


रियाला जामीन मिळाला असला तरी तिचा भाऊ शौविकचा जामीन अर्ज मात्र कोर्टाने फेटाळून लावला आहे. तसेच या प्रकरणात शौविक चक्रवर्ती, अब्दुल बासित परिहार यांचाच अर्ज फेटाळला आहे. तसेच रियासह मिरांडा आणि दीपेश सावंतचा जामीन मंजूर झाला आहे. रिया चक्रवर्तीसह सर्व आरोपींच्या जामीन अर्जावर कोर्टाची प्रक्रीया सकाळी 11 वाजता सुरु झाली होती. त्यानंतर कोर्टाने लगेचच रियाचा जामीन अर्ज मंजूर केला.


न्यायधीश सारंग वी. कोतवाल यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमार्फत आपला निर्णय सुनावला. याआधी 29 सप्टेंबर रोजी या प्रकरणाच्या सुनावणीनंतर कोर्टाने आपला निर्णय राखून ठेवला होता. तसेच मंगळवारी एनडीपीएल कोर्टाने रिया, शौविक, सॅम्युअल, दीपेश, बासित परिहार आणि जैद यांच्या 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी 20 ऑक्टोबरपर्यंत वाढवली होती.


Majha Vishesh | रियाला जामीन, मग सीबीआय, एनसीबीच्या हाती काय?