Akshay Kumar Tiger Shroff on Republic Day 2024 : बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि टायगर श्रॉफ (Tiger Shroff) सध्या 'बडे मियां छोटे मियां' (Bade Miyan Chote Miyan) या सिनेमामुळे चर्चेत आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षय आणि टायगर सध्या जॉर्डनमध्ये या सिनेमाचं शूटिंग करत आहेत. सिनेमाच्या शूटिंगदरम्यान त्यांनी जॉर्डनमध्ये अनोख्या पद्धतीने प्रजासत्ताक दिन (Republic Day 2024) साजरा केला आहे.


'बडे मियां छोटे मियां' या सिनेमात अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ रुपेरी पडद्यावर जबरदस्त अॅक्शन करताना दिसणार आहेत. त्यांच्या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे. सिनेमा रिलीज होण्याआधी अक्षय आणि टायगरच्या जोडीची एक झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे.


अक्षय कुमारने शेअर केला व्हिडीओ (Akshay Kumar Shared Video)


अक्षय कुमारने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये खिलाडीसोबत टायगर श्रॉफदेखील दिसून येत आहे. टायगर आणि अक्षय सध्या 'बडे मियां छोटे मियां' या सिनेमातील एका गाण्याचं जॉर्डनमध्ये शूटिंग करत आहेत. अभिनेते देशापासून दूर असले तरी त्यांची देशभक्ती मात्र कमी झालेली नाही. खिलाडीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो आणि टायगर तिरंगा घेऊन समुद्रकिनाऱ्यावर पळताना दिसत आहेत. 






अक्षयने खास पोस्ट शेअर करत लिहिलं आहे,"नवा भारत, नवा आत्मविश्वास, नवी दृष्टी, आमची वेळ आली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा, जय हिंद, जय भारत". अक्षय-टायगरचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. अभिनेत्याच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.


'बडे मिया छोटे मिया'ची प्रेक्षकांना उत्सुकता


'बडे मिया छोटे मिया' या सिनेमातील धमाकेदार अॅक्शन सीन्सची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. हॉलिवूडपटाप्रमाणे या सिनेमातील अॅक्शन सीन शूट करण्यात आले आहेत. अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. सोनाक्षी सिन्हा, मानुषी छिल्लर, अलाया एफ, पृथ्वीराज सुकुमारन हे कलाकारही या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. अजय देवगनचा 'मैदान' आणि 'बडे मिया छोटे मिया' हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर आमने-सामने येऊ शकतात.


संबंधित बातम्या


Bade Miyan Chote Miyan Teaser Out : 'बडे मिया छोटे मिया'चा धमाकेदार टीझर आऊट! अ‍ॅक्शनमोडमध्ये दिसला अक्षय कुमार अन् टायगर श्रॉफ