Jug Jugg Jeeyo : बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) आणि अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) सध्या त्यांच्या आगामी 'जुग जुग जिओ' (Jug Jugg Jeeyo) या सिनेमामुळे चर्चेत आहेत. सोशल मीडियावरदेखील या सिनेमाची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. अशातच निर्मात्यांनी या सिनेमाचे मोशन पोस्टर रिलीज केले आहे. या पोस्टरमध्ये कियारा आणि वरुणसोबत अभिनेता अनिल कपूर आणि अभिनेत्री नीतू कपूरदेखील दिसत आहेत.
सिने निर्माता करण जोहरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'जुग जुग जिओ' सिनेमाचे मोशन पोस्टर शेअर केलं आहे. पोस्टर शेअर करत करणने लिहिले आहे,'या कुटुंबाचा एक भाग व्हा. लवकरच सिनेमे प्रदर्शित होणार आहे. 24 जूनला भेटू...". नीतू कपूर आणि अनिल कपूर या सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. सिनेमात असणाऱ्या तगड्या स्टारकास्टमुळे प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
अनिल कपूरनेदेखील 'जुग जुग जिओ' सिनेमाचे मोशन पोस्टर शेअर केले आहे. पोस्टर शेअर करत त्याने लिहिले आहे, कुटुंबाला भेटणं ही माझी सगळ्यात आवडती गोष्ट आहे. 'जुग जुग जिओ' हा सिनेमा 24 जूनला तुमच्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. तसेच अनिल कपूरने सिनेमातील सहकलाकारांचे काही फोटोदेखील शेअर केले आहेत.
'जुग जुग जियो' या सिनेमाव्यतिरिक्त कियारा आणि वरुण त्यांच्या इतर सिनेमांमध्येदेखील व्यस्त आहेत. कियारा लवकरच कार्तिक आर्यनसोबत 'भूल भुलैया 2' या हॉरर, विनोदी सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा 20 मे रोजी रिलीज होणार आहे. तर वरुण धवन अभिनेता जान्हवी कपूरसोबत 'बेडियां' आणि करण जोहरच्या 'बवाल' सिनेमात दिसणार आहे.
संबंधित बातम्या