Bollywood Actresses Name   :  बॉलिवूडमधील अनेक कलाकार अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी आपले नाव बदलतात. कलाकारांची खरी नाव त्यांच्या चाहत्यांना माहित नसतील. जाणून घेऊयात रेखा (Rekha),श्रीदेवी (Sridevi),शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) तब्बू (Tabu) या प्रसिद्ध अभिनेत्रींची खरी नावं..


रेखा (Rekha)
रेखा यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळत असतं. रेखा त्यांच्या नृत्याने आणि अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतात. रेखा यांचे खरे नाव भानुरेखा गणेशन असं आहे.  


श्रीदेवी (Sridevi)
बॉलिवूडची चांदनी अशी ओळख असलेल्या अभिनेत्री श्रीदेवी यांचे 2018 मध्ये निधन झाले. श्रीदेवी यांच्या सदमा,जूली आणि मिस्टर इंडिया या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. श्रीदेवी यांचे खरे नाव  श्री अम्मा यंगर अय्यप्पन असं आहे. 


तब्बू (Tabu)
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री तब्बू अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस अली.  हैदर आणि अंधाधुंद या चित्रपटांमधील तब्बूच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. 'दृष्यम' या चित्रपटामधील तब्बूच्या अभिनयाचे अनेकांनी कौतुक केले तब्बूचे खरे नाव हे तबस्सुम हाशमी असं आहे. 


कियारा अडवाणी (Kiara Advani)
अभिनेत्री कियारा अडवाणीचा चाहता वर्ग मोठा आहे. तिच्या आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी तिचे चाहते उत्सुक असतात. कियाराचे खरे नाव आलिया आहे.  रिपोर्टनुसार, अभिनेता सलमान खानच्या सांगण्यावरून कियाराने तिचं नाव बदलून कियारा असं ठेवले. 


शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty)
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे खरे नाव आश्विनी शेट्टी आहे. ज्योतिषांनी सांगितल्यावर शिल्पाने तिचं नाव बदलले होते.


संबंधित बातम्या


Deepika Padukone : ...म्हणून शूटिंग सेटवर दीपिका घेऊन जाते रंगीत पेन्सिल बॉक्स!


Ankita Lokhande : डिझायनर मनीष मल्होत्राने डिझाइन केला अंकिताचा रॉयल लेहेंगा; 1600 तास सुरु होतं काम


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha