Rekha Kisses Richa Chadhas Baby Bump : अभिनेत्री रिचा चढ्ढा (Richa Chadha) आणि अभिनेता अली फझल यांनी यावर्षी  आई-बाबा होणार असल्याचे  माहिती दिली होती. आता अभिनेत्री रिचा चढ्ढा ही संजय लीला भन्साळीच्या (Sanjay Leela Bhansali) 'हिरामंडी' (Hiramandi) या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. नुकताच या मालिकेचा प्रीमियर सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला बॉलिवूडमधील अनेक स्टार्सनी हजेरी लावली. मालिकेतील कलाकार आणि क्रू व्यतिरिक्त आलिया भट्ट, अनन्या पांडे, रेखा आणि सलमान खान यांसारखे अनेक सेलिब्रिटी यावेळी उपस्थित होते. या प्रीमियर सोहळ्यातील एक क्यूट व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये अभिनेत्री रेखा गरोदर असलेली अभिनेत्री रिचा चढ्ढासोबत बोलताना दिसत आहे. रिचासोबत संवाद साधताना रेखाने तिच्या बेबी बंपला किस केले. याचा व्हिडीओ समोर आला आहे. 


सोशल मीडियावरील या व्हिडीओवर लोकांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे. या व्हिडीओत अभिनेत्री रेखा ही रिचा चढ्ढाचा हात पकडून  गप्पा मारताना दिसत आहे. दोघींमध्ये बराच वेळ चर्चा झाल्यानंतर रेखाने रिचाच्या बेबी बम्पला किस करत होणाऱ्या बाळाला खूप आशीर्वाद दिले. सोशल मीडियावरील या व्हिडीओवर लोकांनी लाइक्स, कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. 






 


रेखा म्हणजे निर्मळ मनाची अभिनेत्री


या व्हिडीओवर लोकांच्या कमेंट्स येत आहे. लोकांनी या क्षण भावूक असल्याचे म्हटले. एका युजरने म्हटले की,  रेखाचे मन किती निर्मळ आहे. तर, एका युजरने रेखाची ओव्हर अॅक्टिंग कधीच संपणार नाही. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट्स करताना रेखाचे कौतुक केले आहे. 


संजय भन्साळी यांचे ओटीटीवर पदार्पण






संजय लीला भन्साळीच्या या डेब्यू वेब सीरिजमध्ये मनिषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, संजीदा शेख, अदिती राव हैदरी, रिचा चढ्ढा, शर्मिन सहगलसह शेखर सुमन, फरदीन खान आदींच्या भूमिका आहेत. 


इतर संबंधित बातम्या :