Ravi Kishan On Animal :   विविध मुद्यांवर बेधडक वक्तव्य करण्यासाठी अभिनेता रवी किशन (Ravi Kishan) ओळखला जातो. त्यामुळे अनेकदा रवी किशन विनाकारण वादात, चर्चेत अडकतो. आता पुन्हा एकदा रवी किशन चर्चेत आला आहे.  गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या संदीप रेड्डी वंगा (Sandeep Reddy Vanga) दिग्दर्शित 'ॲनिमल' या (Animal Movie) चित्रपटाची आजही बरीच चर्चा होत आहे. आता रवी किशन 'लापता लेडीज' (Laapataa Ladies) या चित्रपटात दिसणार आहे. रवी या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. दरम्यान, रवीने रणबीर कपूरच्या ॲनिमल या चित्रपटातील त्याच्या अल्फा मेल व्यक्तिरेखेवर टीका केली आहे.  


पत्नीची सेवा करणारा खरा अल्फा मेल 


'आज तक'शी बोलताना रवी किशनने म्हटले की, 'हा अल्फा मेल, बीटा मेल हा काय  प्रकार आहे? सिंहाला अल्फा म्हणतात आणि तोही शांत राहतो. तो कुणाशी भांडतो, एवढेच नाही. माझ्या मते अल्फा पुरुष हाच जो आपल्या पत्नीची सेवा करतो. डोक्याला तेल लावून बायकोचे पाय दाबावेत असे रवी किशनने म्हटले.  


खरा अल्फा मेल तो आहे जो स्त्रियांचा आदर करतो. खरे सांगायचे तर स्त्रिया अल्फा झाल्या आहेत. आता वेळ आली आहे की जर तुम्ही तुमच्या पत्नीला मारहाण केली तर ती तुम्हाला मारेल, म्हणून नीट जगा आणि तिचा आदर करा, असा सल्लाही रवी किशनने अल्फा मेल समर्थकांना केला.  


पुरुष स्त्रियांना घाबरतात


रवी किशनने पुढे म्हटले की, 'पुरुषांना वाटते की मी अल्फा मेल आहे आणि ते उत्तेजित होतात, पण प्रत्यक्षात ते घाबरतात. महिला सक्षमीकरण इतके झाले आहे की आता त्यांना भीती वाटू लागली आहे. ही भीती देखील आवश्यक असल्याचेही रवी किशनने म्हटले. 


रवी किशनची 'लापता लेडीज'मध्ये प्रमुख भूमिका


आगामी 'लापता लेडीज' या चित्रपटात अभिनेता रवी किशनची प्रमुख भूमिका असणार आहे. रेल्वे प्रवासादरम्यान बेपत्ता झालेल्या दोन नववधू तरुणींवर चित्रपटाची कथा बेतली आहे.  पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणारा रवी किशन या प्रकरणाचा तपास सुरू करतो. 






हा चित्रपट आमिर खानच्या प्रोडक्शन हाऊस अंतर्गत तयार होत आहे. आमिर खानने रवी किशनच्या भूमिकेसाठी ऑडिशनही दिले होते. त्याला हे पात्र साकारायचे होते. पण किरण रावने त्याला नकार दिला. आमिर खान सुपरस्टार अभिनेता असल्याने त्याने भूमिका साकारल्यास इतर कलाकारांवर दबाब येईल यामुळे किरण रावने आमिरला नकार दिला. हा चित्रपट 1 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.