Rashmika Mandanna : नुकतीच देशभरात ईद साजरी करण्यात आली. या निमित्ताने अनेक कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना शुभेच्छा दिल्या. यात ‘नॅशनल क्रश’ अभिनेत्री रश्मिका मंदना (Rashmika Mandanna) हिने देखील एक फोटो शेअर करत चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, रश्मिकाचा हा फोटो प्रचंड चर्चेत आला आहे. या फोटोत राष्मिकाने लाल रंगाचा हिजाब परिधान केला आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या या फोटोमागे कारणही खास आहे.


'पुष्पा' चित्रपटामुळे रश्मिकाची बॉलिवूडमधील क्रेझ वाढली आहे आणि त्यामुळेच ती आता हिंदी चित्रपटसृष्टीतही पाऊल ठेवणार आहे. या फोटोतून तिने तिच्या आगामी चित्रपटाची झलक दाखवली आहे. त्यामुळेच तिचा हा फोटो सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.


रश्मिकाने तिच्या आगामी ‘सीता रमण’ (Sita Raman) या चित्रपटातील फर्स्ट लूक रिलीज केला आहे. या लूक रिव्हीलसाठी तिने खास ईदचा दिवस निवडला आहे. रश्मिकाने तिच्या या लूकचा फोटो शेअर करत चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.


रश्मिकाच्या हिजाब लूकची चर्चा


या पोस्टरमध्ये अभिनेत्रीचा लूक पाहून आता तिची नेमकी भूमिका काय असणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. या लूकमध्ये रश्मिका लाल रंगाचा हिजाब परिधान केलेली दिसत आहे. तिच्या या आगामी चित्रपटाचे नाव ‘सीता रमण’ असे आहे. रश्मिकाने ईदचं निमित्त साधत प्रेक्षकांना आपल्या या पात्राची झलक दाखवली आहे. या चित्रपटात रश्मिकासोबत साऊथ स्टार दुलकर सलमान आणि अभिनेत्री मृणाल ठाकूर देखील दिसणार आहेत. या चित्रपटात दुलकर एका सैनिकाच्या भूमिकेत दिसणार आहे, तर मृणालही एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.


बॉलिवूड एन्ट्रीसाठी सज्ज रश्मिका


रश्मिका मंदाना सध्या तिच्या बॉलिवूड एन्ट्रीची जोरदार तयारी करत आहे. लवकरच ती 'मिशन मजनू' (Mission Majanu) या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणार आहे. या चित्रपटामध्ये ती अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर, दुसरीकडे ती अमिताभ बच्चन यांच्यासोबत देखील तिच्या आगामी हिंदी चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे. रश्मिका लवकरच करण जोहरचा लोकप्रिय शो 'कॉफी विथ करण 7' मध्येही दिसणार आहे.


हेही वाचा: