Rasha Thadani Dance On Uyi Amma : अभिषेक कपूरचा (Abhishek Kapoor) आगामी 'आझाद' (Azad) या चित्रपटातील 'उई अम्मा' (Uyi Amma) हा डान्स ट्रॅक रिलीज झाला आणि सगळीकडे चर्चांना उधाण आलं. या गाण्यात रवीना टंडनची (Raveena Tandon) मुलगी राशा थडानी आणि अजय देवगणचा (Ajay Devgn) पुतण्या अमन देवगण झळकले आहेत. हा ट्रॅक या वर्षातील सर्वोत्कृष्ट देसी पार्टी अँथम असणार असल्याच्या चर्चाही सुरू झाल्या आहेत. भन्नाट कोरिओग्राफीसह राशानं 'उई अम्मा' (Uyi Amma) गाण्यात अप्रतिम डान्स परफॉर्मन्स दिला आहे. तिला पाहुन सर्वांना 90 च्या दशकातील रविना टंडनची आठवण झाली.


मधुबंती बागची यांचा आवाज आणि अमिताभ भट्टाचार्य यांच्या म्युझिकनं हा ट्रॅक अमित त्रिवेदी यांनी संगीतबद्ध केला आहे. बॉस्को लेस्ली मार्टिसनं कोरिओग्राफ केलेलं 'उई अम्मा' हे गाणं खूप धमाल करत आहे आणि नेटकऱ्यांनी कमेंट करत राशावर कौतुकाचा वर्षाव सुरू केला आहे.






'उई अम्मा'मध्ये राशा थडानीचं कौतुक


'उई अम्मा' ट्रॅकबाबत बोलताना अभिषेक कपूर म्हणाला की, "अमित आणि अमिताभमध्ये गाण्याचा आत्मा पकडण्याची क्षमता आहे आणि उई अम्मा गाण्यातून त्यांनी सर्वांना हे दाखवून दिलं आहे. गाणं तर अप्रतिम आहेच, पण राशाच्या डान्स परफॉर्मन्सनं हे परिपूर्ण झालं आहे. ज्यामुळे हा ट्रॅक अँथम बनला आहे.  त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की, 'उई अम्मा' गाणं देशभरात धम्माल करणार आहे. तर, सर्वांना आपल्या तालावर नाचवणारही आहे. 






'आजाद'ची कहाणी काय? 


'उई अम्मा' गाण्यावर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. तर, आगामी 'आज़ाद' चित्रपटात हे गाणं असणार आहे. 'आज़ाद' चित्रपटात स्वातंत्र्यापूर्वीच्या भारताची कहाणी दिखावली जाणार आहे. अजय देवगन, राशा थडानी, अमान देवगण आणि डायना पेंटी यांचा चित्रपट एका कुशल घोडेस्वाराची कहाणी सांगते. हा घोडेस्वार क्रूर ब्रिटीश सैन्याच्या तावडीतून निसटतो. त्याचा घोडा बेपत्ता असतो, ज्यानंतर तो एका तरुणाच्या मदतीनं एका मिशनवर जातो. 






'आजाद'ची रिलीज डेट


अभिषेक कपूरच्या दिग्दर्शनात बनलेल्या 'आझाद'मध्ये भावनांसोबतच ॲक्शनही आहे. प्रेम, निष्ठा आणि धैर्यानं परिपूर्ण असलेला हा चित्रपट 17 जानेवारी 2025 रोजी रिलीज होणार आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Pushpa 2 Box Office Collection Day 31: अजूनही अल्लू अर्जुनचा बॉक्स ऑफिसवर दबदबा; 'पुष्पा 2'ची पाचव्या शनिवारी भरपूर कमाई, तरीही 1200 कोटींचा क्लब दूर