One Kiss 37 Retake: बॉलिवूड (Bollywood) आणि रोमान्स (Romance), हे न तुटणारं समीकरण. कोणताही बॉलिवूडपट असला तरी त्यात रोमान्सचा मसाला हवाच. बॉलिवूडमध्ये दरवर्षी अनेक रोमॅन्टीक चित्रपट रिलीज होत असतात, ज्यामध्ये अगदी इंटिमेट सीन्सही सर्रास दाखवले जातात. तसेच, हॉलिवूडप्रमाणेच बॉलिवूडमध्येही किसिंग सीन्स अगदी सामान्य झाले आहेत. आजही बॉलिवूडमध्ये रोमँटिक चित्रपटांचा भरणा आहे, ज्यामध्ये अनेक रोमँटिक सीन अभिनेते आणि अभिनेत्रींमध्ये चित्रित केले जातात. अभिनेता इमरान हाशमीची तर सिरिअल किसर म्हणून नावंच पडलं आहे. पण, इमरानशिवाय असाही एक बॉलिवूड अभिनेता आहे, ज्यानं एका किसिंग सीनसाठी तब्बल 37 वेळा रिटेक घेतले आहेत. बरं हा अभिनेता एवढ्यावरच थांबला नव्हता, तर या सीनला कंटाळून या अभिनेत्यानं चित्रपटातील मुख्य अभिनेत्रीचं डोकंही फोडलं होतं. आजवर बॉलीवूडच्या या 'प्रिन्स'नं 18 पैकी 8 सुपरहिट चित्रपट दिले आहेत. तसेच, या अभिनेत्याला बॉलिवूडचा चॉकलेट बॉय म्हणूनही ओळखलं जातं.
चित्रपटाचं नाव काय?
2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचं नाव 'कांची: अनब्रेकेबल' आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यनसोबत अभिनेत्री मिष्टी चक्रवर्ती दिसली होती. या चित्रपटात कार्तिक आर्यनची भूमिका एका प्रेमात आकंठ बुडालेल्या तरुणाची होती. चित्रपटाचे दिग्दर्शक सुभाष घई होते. सुभाष घई यांनी चित्रपटासाठी किसिंग सीन ठेवला होता. ठरल्याप्रमाणे किसिंग सीन शूट करायचं ठरलं. पण, या सीनचं शुटिंग पूर्ण होईपर्यंत दिग्दर्शकाला घाम फुटलेला.
एक किस आणि 37 रीटेक
कार्तिक आर्यननं एका मुलाखतीत या सीनबद्दल सांगितलं की, "हा किसींग सीन एवढा डोकेदुखीचा ठरेल असं मला कधीच वाटलं नव्हतं, आम्ही सेटवर एखाद्या कपलसारखं वागत होतो आणि एक किसिंग सीन शूट करण्यासाठी तब्बल 37 रिटेक घेतले, तेव्हा सुभाष सरांनी सीनला ओके दिला. मग आम्ही आनंदानं घरी गेलो. कुणास ठाऊक, मिष्टी या किसिंग सीनमध्ये जाणूनबुजून चूक करत असेल, कारण मला किसिंग सीन शूट कसा करायचा, याबाबत काहीच माहिती नव्हती. दिग्दर्शक सुभाष घईंना जसा किसिंग सीन हवा होता, तो कसा करायचा याबाबत माझ्या मनात अनेक प्रश्न होता. शेवटी मी त्यांनाच जाऊन विचारलं नेमकं काय करायचंय?"
दरम्यान, नुकताच कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया-3' हा हॉरर-कॉमेडी चित्रपट रिलीज करण्यात आला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिस गाजवलं होतं. भूल भुलैया 3 नं बॉक्स ऑफिसवर अजय देवगणच्या सिंघम अगेनसोबत झालं होतं. कार्तिक आर्यनच्या चित्रपटानं
तुम्हाला सांगतो, कार्तिक आर्यन दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज झालेल्या 'भूल भुलैया-३' या हॉरर-कॉमेडी चित्रपटात शेवटचा दिसला होता. भूल भुलैया 3 ने बॉक्स ऑफिसवर अजय देवगणच्या सिंघम अगेनशी स्पर्धा केली आणि कार्तिकच्या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर बाजी मारली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
शाहरुखनं लग्नाच्या 33 वर्षांनी मक्केला जात गौरी खानचं धर्मपरिवर्तन केलं? Viral Photo मुळे खळबळ