Rasha Thadani : दिग्गज अभिनेत्री रविना टंडनची मुलगी राशा थडानी 'उई अम्मा' या गाण्यामुळे चांगलीच प्रसिद्ध झाली. तिचे हे गाणे चांगलेच गाजले. विशेष म्हणजे तिने या गाण्यात केलेल्या नृत्याला भरभरून प्रेम मिळाले. दरम्यान, रासा थडानीच्या अभिनयाला तसेच तिने केलेल्या नृत्याला सिनेरसिकांचे प्रेम मिळत असले तरी तिचे एक स्वप्न मात्र पूर्णच राहणार आहे. तिच्या वडिलांनी पुष्पा-2 हा चित्रपट हिट करण्यात मोलाचे योगदान दिले. मात्र याच राशा थडानीचे हे स्वप्न मात्र अधुरेच राहण्याची शक्यता व्यक्तक केली जात आहे. 


राशा थडानीच्या वडिलांचा आणि पुष्पा-2 चित्रपटाचा संबंध काय? 


पुष्पा-2 या चित्रपटाने बॉक्स ऑफिसचे अनेक रेकॉर्ड मोडले. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. अल्लू अर्जुनचा हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठऱण्यात राशा थडानीच्या वडिलांचा मोठा वाटा आहे. राशा थडानीच्या वडिलांचे नाव अनिल थडानी असे आहे. ते ए ए फिल्म्स या इन्टरटेन्मेंट कंपनीचे मालक आहेत. अनिल थडानी यांच्याकडे पुष्पा-2 या चित्रपटाच्या वितरणाचे हक्क होते. पुष्पा-2 या चित्रपटाच्या अनेक वितरकांपैकी तेही एक वितरक होते. त्यांनी उत्तर भारतातील वितरणाचे हक्क घेतले होते. म्हणूनच पुष्पा-2 हा चित्रपट हिट करण्यात अनिल थडानी यांचा मोठा वाटा असल्याचे म्हटले जात आहे. असे असले तरी त्यांची मुलगी राशा थडानीचे एक स्वप्न मात्र अधुरेच राहणार आहे. 


राशाचं कोणतं स्वप्न राहणार अधुरं? 


रविना टंडन आणि अनिल थडानी यांची मुलगी राशा थडानी आता स्टार झाली आहे. अजय देवगन याच्या आझाद या चित्रपटाच्या माध्यमातून राशाने आता सिनेसृष्टीत पाय ठेवला आहे. या चित्रपटात तिने केलेल्या कामाचे मोठे कौतुक झाले आहे. तिच्या अभिनयाला अनेकांनी दाद दिली आहे. पण कमाईच्या बाबतीत हा चित्रपट फार काही कमाल दाखवू शकलेला नाही. कोणत्याही अभिनेता किंवा अभिनेत्रीला आपला पहिला चित्रपट हिट ठरावा असे वाटते. तसे झाल्यास संबंधित कलाकाराचा सिनेसृष्टीतील पुढचा मार्ग अकदी सुकर होतो. मात्र आझाद हा चित्रपट हिट ठरण्याबाबत साशंकता व्यक्त केली जाते. त्यामुळे राशा थडानीचे पहिला चित्रपट हिट ठरण्याचे स्वप्न अधुरेच राहण्याची शक्यता आहे. 






आझाद चित्रपटाची कमाई किती?


आझाद हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून फार काही पैसे कमवू शकलेला नाही. या चित्रपटाने 17 जानेवारी रोजी फक्त 1.5 कोटी रुपये कमवले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 1.3 कोटी रुपये कमवले. रविवार हा सुट्टीचा दिवस असूनही हा चित्रपट फार काही खास पैसे कमवू शकला नाही. रविवारी हा चित्रपट फक्त 1.85 कोटी रुपये कमवू शकला. विकएंडला हा चित्रपट फार चांगला गल्ला जमवू शकला नसेल तर उर्वरित दिवशीही हा चित्रपट फार काही खास कामगिरी करण्याची शक्यता नाही. त्यामुळेच हा चित्रपट फ्लॉप ठरतोय की काय? अशी शाशंकता व्यक्त केली जात आहे. 


हेही वाचा


Makar Sankranti 2025: 'सारेगमप लिटिल चॅम्प्स'च्या मुग्धा आणि प्रथमेशने साजरी केली पहिली संक्रांत!


Asambhav Movie: 'असंभव' चित्रपटात 'हा' मराठी अभिनेता दिग्दर्शकाच्या भूमिकेत, सध्या गाजवतोय टेलिव्हिजन इंडस्ट्री