Films And Web Series Releasing In January 2022 : 
नवीन वर्षाची अर्थात 2022 ची सुरुवात खूपच फिल्मी होणार आहे. वर्षाच्या पहिल्याच महिन्यात अर्थात जानेवारी 2022 मध्ये बॉक्स ऑफिसवर अनेक बिग बजेट सिनेमे आणि वेबसीरिज प्रदर्शित होणार आहेत. जाणून घ्या कोणते सिनेमे आणि वेबसीरिज प्रदर्शित नव्या वर्षाच्या सुरुवातीला प्रदर्शित होणार आहेत. 


आरआरआर (RRR)
7 जानेवारी 2022 रोजी 'आरआरआर'  चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये लोकप्रिय कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. आरआरआर चित्रपटात अजय देवगण, आलिया भट्ट,  ज्यूनियर एनटीआर आणि राम चरण या कालाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.  एसएस राजामौली यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. आरआरआर या थरार नाट्य असणाऱ्या चित्रपटाची निर्मिती  डी.व्ही.व्ही. दनय्या यांनी केली आहे.


कौन बनेगी शिखरवती
'कौन बनेगी शिखरवती' (Kaun Banegi Shikharwati) ही वेबसीरिज 7 जानेवारी 2022 रोजी झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या वेबसीरिजचे दिग्दर्शन गौरव चावला आणि अनन्या बनर्वीने केले आहे. या वेबसीरिजमध्ये नसीरुद्दीन शाह राजाची भूमिका साकारणार आहे. 


ये काली काली आंखें
'ये काली काली आंखें' ही सिद्धार्थ सेनगुप्ता दिग्दर्शित बहुप्रतिक्षित वेबसीरिज आहे. ताहिर राज भसीन, श्वेता त्रिपाठी आणि आंचल सिंह यांच्या या सीरिजमध्ये मुख्य भूमिका आहेत. ही वेबसीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार असून 14 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


राधे श्याम
दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा (Prabhas) आगामी 'राधे श्याम' (Radhe Shyam) सिनेमा 14 जानेवारीला बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालणार आहे. या सिनेमात प्रभाससोबत पूजा हेगडेदेखील मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट तमिळ, तेलुगु, मल्याळम सोबत हिंदी भाषेतदेखील प्रदर्शित होणार आहे.


पृथ्वीराज
पृथ्वीराज या चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी केले आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसह संजय दत्त आणि सोनू सूद महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर या सिनेमात 'संयोगिता'च्या भूमिकेत असणार आहे. 


अटॅक
जॉन अब्राहम, जॅकलीन फर्नांडिस आणि रकुल प्रीत यांचा 'अटॅक' हा चित्रपट 28 जानेवारीला सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. अटॅक हा थरार नाट्य असलेला सिनेमा आहे. या सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. प्रेक्षक आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. 


संबंधित बातम्या


Jersey Movie Posponed : 'जर्सी' सिनेमाला कोरोनाचा फटका; रिलीज डेट ढकलली पुढे


सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस; फराह खान करणार दिग्दर्शन


Yami Gautam : यामी गौतम करतेय त्वचा रोगाचा सामना; म्हणाली, 'लोक मला...'


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha