Ranveer Singh, Deepika Padukone : बॉलिवूडची ‘मस्तानी’ अर्थात अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि ‘बाजीराव’ अर्थात अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) हे प्रेक्षकांचे बॉलिवूडमधील सर्वात लाडके जोडपे आहेत. त्यांची प्रेमकहाणी एखाद्या परीकथेपेक्षा कमी नाही. दोघांनी 2012 मध्ये एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती आणि 2018 मध्ये इटली पार पडलेल्या एका खाजगी समारंभात त्यांनी लग्न केले. दरम्यान, आता सोशल मीडियावर रणवीर आणि दीपिकाच्या वैवाहिक नात्यात सारं काही आलबेल नसल्याची चर्चा सुरु आहे. ही गोष्ट चाहत्यांना कळताच एकच खळबळ उडाली. मात्र, रणवीर सिंहने यावर स्पष्टीकरण दिले आहे.


दीपिका आणि रणवीरच्या नात्यात सर्व काही ठीक नसल्याचे सांगणारे एक ट्विट चर्चेत आले होते. दोघांच्या नात्यात सध्या काही समस्या सुरु असल्याचे या ट्विटमध्ये म्हटले गेले होते. हे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. ज्यानंतर त्यांच्या चाहत्यांमधून नाराजीचा सूर ऐकू येऊ लागला.


नेमकं काय झालं?


सोशल मीडियावर येणाऱ्या सगळ्याच बातम्या खऱ्या नसल्या, तरी आपल्या एखाद्या लाडक्या कलाकाराबाबत जर काही असेल, तर कुणीही त्यावर सहज विश्वास ठेवतं. असंचं काहीसं दीपिका आणि रणवीर यांच्या बाबतीत झालं आहे. ट्विटरवर एका युझरने रणवीर आणि दीपिकाच्या नात्यात बिनसलंय, असं ट्विट केलं. हे ट्विट पाहता पाहता व्हायरल झालं आणि चाहते यावर कमेंट करत प्रश्न विचारू लागले. काहींनी रणवीर आणि दीपिकाला टॅग करत प्रश्न विचारले. मात्र, आता रणवीरनेच या अफवांना पूर्णविराम दिला आहे.



काय म्हणाला रणवीर सिंह?


नुकत्याच एका मुलाखतीत रणवीर (Ranveer Singh) म्हणाला की, मला दीपिकासोबत (Deepika Padukone) आणखी एखादा चित्रपट करायचा आहे. मला तिचं खूप कौतुक आहे. एका कार्यक्रमादरम्यान रणवीरला दीपिकासोबतच्या त्याच्या नात्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर रणवीर सिंहने दिलेले उत्तर ऐकून त्यांचे चाहते मात्र नक्कीच खुश झाले. रणवीर म्हणाला, 'आम्ही 2012 मध्ये भेटलो आणि डेटिंगला सुरुवात केली, आणि आता 2022मध्ये आमच्या नात्याला 10 वर्षे पूर्ण झाली आहे. आम्ही दहा वर्ष एकत्र आहोत’.


‘मी दीपिकाचा खूप आदर करतो. वैयक्तिक आयुष्यातही मी दीपिकाकडून खूप काही शिकलो आहे. तुम्ही सर्वजण आम्हाला मोठ्या पडद्यावर पुन्हा एकत्र पाहाल. दीपिका ही माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहे आणि ती माझ्या आयुष्यात आल्याबद्दल मी खूप आभारी आहे’, असे रणवीर म्हणाला. अर्थात रणवीरच्या या स्पष्टीकरणानंतर सोशल मीडियावरच्या या अफवांना पूर्ण विराम मिळाला आहे.


हेही वाचा :


Ranveer Singh,Deepika Padukone : रणवीरचं न्यूड फोटोशूट पाहून दीपिका झाली इम्प्रेस; अशी दिली रिअॅक्शन