Vikram Vedha Vs Ponniyin Selvan : यंदाच्या वीकेंडला प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. या आठवड्याच्या शेवटी दोन बिग बजेट चित्रपट रिलीज होणार आहेत. हृतिक रोशन आणी सैफ आली खान अभिनित ‘विक्रम वेधा’ (Vikram Vedha) आणि ऐश्वर्या राय, चियान विक्रम अभिनित ’पोन्नियिन सेल्वन’ (Ponniyin Selvan) हे दोन बहुप्रतीक्षित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या दोन्ही चित्रपटांचे जोरदार प्रमोशन सुरु आहे. या चित्रपटांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. हे चित्रपट एकाच दिवशी रिलीज होणार असल्याने बॉक्स ऑफिसवर मोठी स्पर्धा पाहायला मिळणार आहे.


एका चित्रपटात जबरदस्त अ‍ॅक्शन सीक्वेन्स पाहायला मिळणार आहे, तर दुसरीकडे एका ऐतिहासिक भव्य दिव्या ड्रामा पाहायला मिळणार आहे. हे दोन्ही चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच यांची जोरदार चर्चा रंगली आहे. त्यामुळे प्रेक्षक देखील चित्रपट पाहण्यासाठी आतुर झाले आहेत.


एकाचवेळी 100 देशांमध्ये होणार प्रदर्शित


‘विक्रम वेधा’ हा याच नावाच्या साऊथ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि ऋतिक रोशन (Hrithik Roshan) हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. विक्रम वेधा चित्रपटाच्या तमिळ व्हर्जनमध्ये ‘विक्रम’ ही भूमिका आर. माधवननं साकारली होती, तर ‘वेधा’ ही भूमिका अभिनेता विजय सेतुपतीनं (Vijay Sethupathi) साकारली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. सैफ आणि हृतिकचा हा चित्रपट जगभरातील 100हून अधिक देशांमध्ये प्रदर्शित होणार असून, हा चित्रपट आतापर्यंतचा सर्वात मोठी ओपनिंग मिळणारा चित्रपट ठरणार आहे. भारताव्यतिरिक्त, उत्तर अमेरिका, यूके, मध्य पूर्व ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड सारख्या मोठ्या देशांमध्ये ‘विक्रम वेधा’ एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहे. याशिवाय हा चित्रपट युरोपातील 22 आणि आफ्रिकेतील 27 देशांमध्ये देखील प्रदर्शित होणार आहे. यासह जपान, रशिया, इस्रायल, लॅटिन अमेरिका यांसारख्या देशांमध्येही ‘विक्रम वेधा’ प्रदर्शित केला जाणार आहे.


‘पोन्नियिन सेल्वन पार्ट 1’ही चर्चेत!


‘पोन्नियिन सेल्वन पार्ट 1’ (Ponniyin Selvan) या चित्रपटात ऐश्वर्या राय-बच्चन एका राणीच्या भूमिकेत दिसणार आहे. ऐश्वर्याला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी तिचे चाहते वाट पाहत आहेत. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक मणिरत्नम 'पोन्नियिन सेल्वन' (Ponniyin Selvan) या चित्रपटाच्या माध्यमातून चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक करत आहे. हा चित्रपट हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे. 'पोन्नियिन सेल्वन' हा चित्रपट दोन भागांमध्ये रिलीज करण्यात येणार आहे. याचा पहिला भाग ‘पोन्नियिन सेल्वन पार्ट 1’ हा 30 सप्टेंबरला म्हणजेच उद्या रिलीज होणार आहे. या चित्रपटाची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. विशेषत: त्याच्या बजेटमुळे तो खूप चर्चेत आहे. हा चित्रपट बनवण्यासाठी तब्बल 500 कोटी रुपये खर्च झाल्याचे बोलले जात आहे. चोल राजवटीवर आधारित हा चित्रपट लोकांना किती पसंत पडेल हे लवकरच कळणार आहे.


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 


Vikram Vedha : 'विक्रम वेधा'चे जबरदस्त पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला; ‘या’ दिवशी रिलीज होणार चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर!


Hrithik Roshan : ह्रतिकचा 'विक्रम वेधा' मधील लूक; फोटो पाहून सबा म्हणाली..