Ranveer Singh: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असतो. अनेक वेळा नेटकरी रणवीरच्या अतरंगी स्टाईलमुळे त्याला ट्रोल करतात. गेल्या काही दिवसांपासून रणवीर हा त्याच्या न्यूड फोटोशूट प्रकरणामुळे चर्चेत आहे.  नुकताच रणवीर हा मुंबई विमानतळावर त्याच्या अॅस्टन मार्टिनमध्ये (Aston Martin) दिसला. रणवीरची ही आलिशान गाडी तब्बल 3.9 कोटींची आहे. पण, आता रणवीर त्याच्या या लग्झरी कारमुळे अडचणीत आला आहे. अनेक जण रणवीरवर अरोप करत आहेत की, रणवीरच्या या गाडीचा  विमा संपला आहे. खरंच रणवीरचा विमा संपला आहे का? त्याच्यावर हे आरोप का केले जात आहेत? हे नेमकं प्रकरण काय आहे? याबाबत जाणून घेऊयात...


काय आहे प्रकरण? 
एका ट्विटर युजरच्या मते, रणवीर सिंहच्या या कारचा विमा 28 जून 2020 रोजी संपला होता. तरीही ही रस्त्यांवर कार चालवून बॉलिवूड अभिनेत्याने वाहतूक नियमांचे उल्लंघन केले आहे. अशा परिस्थितीत त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी. अशी मागणी त्याने केली. तर, त्याच्या ट्विटवर रिप्लाय देत मुंबई पोलिसांनी ‘आम्ही ट्रॅफिक पोलिसांना याबद्दल माहिती दिली आहे’, असे म्हटले आहे.


नेटकऱ्याच्या या आरोपानंतर रणवीरला अनेकांनी सोशल मीडियावर ट्रोल केलं. आता यशराज फिल्म्सनं रणवीरने अॅस्टन मार्टिन कारचा विमा वैध असल्याचे सिद्ध करण्यासाठी पुरावे सादर केले आहेत. 


“काल एका ट्विटर युझरनं रणवीर त्याची 3.9 कोटी रुपयांची अॅस्टन मार्टिन विमा संपला असूनही चालवतो, असा आरोप केला. मुंबई विमानतळावर जेव्हा रणवीर आला तेव्हा  तो त्याच्या अ‍ॅस्टन मार्टिनमध्ये बसला, जी तिथे आधीच होती. एका वापरकर्त्याने दावा केला की त्याच्याकडे या वाहनासाठी वैध विमा पॉलिसी नाही. वस्तुस्थिती तपासल्यावर आम्हाला कळाले की, रणवीरकडे असणाऱ्या या गाडीचा विमा हा वैध आहे. सोशल मीडियाच्या या जगात अनेक खोट्या बातम्या पसरत असतात. पण फॅक्ट चेक न करता अशा बातम्या पसरवल्या जात आहे. ” अशी माहिती यशराज फिल्म्सनं दिली. 


रणवीरच्या गाडीच्या विम्याचा यशराज फिल्म्सनं सादर केलेला स्क्रिनशॉर्ट :



वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 


 


Ranveer Singh : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह पुन्हा अडचणीत; विमा संपलेली कार चालवणं पडणार महागात?