Timepass 3 : 'टाइमपास', 'टाइमपास 2'च्या यशानंतर 'टाइमपास 3' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमाने सिनेमागृहात चांगलाच धमाका केला. आता सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर 'टाइमपास 3' (Timepass 3) या सिनेमाचा आता वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर होणार आहे. 


'टाइमपास 3' या सिनेमात हृता दुर्गुळे (Hruta Durgule) आणि प्रथमेश परब (Prathamesh Parab) मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमात कुमारवयातल्या दगडू आणि पालवीचा आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा रवी जाधव यांनी सांभाळली आहे. झी स्टुडिओज आणि अथांश कम्युनिकेशन्सने या सिनेमाची निर्मिती केली आहे. या सिनेमात प्रेक्षकांना दगडूच्या आयुष्यात आलेली पालवी पाहायला मिळणार आहे.


'टाइमपास 3'चं कथानक काय आहे?


36 टक्के मिळवून बारावीची परीक्षा पास झाल्यानंतर दगडू म्हणजेच प्रथमेश परब कॉलेजविश्वात पाऊल टाकतो आणि मग पुढे काय होतं हे या सिनेमात पाहायला मिळणार आहे. गुंड म्हणून आपला भूतकाळ मागे टाकून नवी सुरुवात करण्याचा दगडूचा निश्चय त्याच्या भोवती असलेल्या लोकांमुळे पणाला लागतो. आपण कधीच बदलणार नाही असं त्याला वाटायला लागतं, मात्र तरीही पुढे जात राहाण्याचं बळ त्याला मिळतं, कारण तो एका गँगस्टरच्या मुलीच्या- पालवीच्या म्हणजेच हृता दुर्गुळेच्या प्रेमात पडतो. 


दगडूच्या सुसंस्कृत वागण्यानं पालवी प्रभावित होते, मात्र सगळ्याच चांगल्या गोष्टी कधी ना कधी संपतात या न्यायाने दगडूचं हा उसना अवतारही संपतो. त्यामुळे दगडू- पालवीच्या नात्यावर काय परिणाम होतो हे या सिनेमात दाखवण्यात आलं आहे. 




'टाइमपास 3' या सिनेमात प्रथमेश परब आणि हृता दुर्गुळेसह संजय नार्वेकर, भाऊ कदम, वैभव मांगले प्रमुख भूमिकेत आहेत. हास्य आणि रोमान्सची अनुभूती देणारा हा धमाल सिनेमा प्रेक्षकांना आता घरबसल्या पाहता येणार आहे. 30 ऑक्टोबरला झी मराठीवर दुपारी 12.00 वा. या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर होणार आहे. 


संबंधित बातम्या


Timepass 3 : 'टाइमपास 3' चा वर्ल्ड डिजिटल प्रीमिअर; 16 सप्टेंबर रोजी करण्याची ZEE5 होणार प्रदर्शित