Box Office Clashes : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहने (Ranveer Singh) नुकतीच त्याच्या आगामी 'सर्कस' (Cirkus) सिनेमाची रिलीज डेट जाहीर केली आहे. हा सिनेमा 23 डिसेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. तसेच टायगर श्रॉफचा (Tiger Shroff) 'गणपत' (Ganpath) सिनेमादेखील 23 डिसेंबरलाच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे हे दोन सिनेमे बॉक्स ऑफिसवर आमने-सामने येणार आहेत. 


निर्मता रोहित शेट्टीने मंगळवारी 'सर्कस' सिनेमाचे पोस्टर आऊट केले आहे. हा सिनेमा 'द कॉमेडी ऑफ एर्स' या नाटकावर आधारित आहे. 2022 च्या नाताळात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा आधी 15 जुलैला प्रदर्शित होणार होता. पण वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे आता रणवीर आणि टायगर प्रेक्षकांना मनोरंजनाचा डबल डोस देणार आहेत. 


बिग बजेट सिनेमे आमने-सामने


'सर्कस' आणि 'गणपत' हे दोन्ही बिग बजेट सिनेमे आहेत. दोन्ही सिनेमे 23 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 'गणपत' सिनेमात टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत आहे. तर 'सर्कस' सिनेमात टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत आहेत. 'गणपत' सिनेमात टायगर श्रॉफसोबत कृती सेननदेखील दिसून येणार आहे. 


अॅक्शनच्या तडका असलेल्या 'गणपत' सिनेमात टायगर श्रॉफ आणि कृती सेनन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. विकास बहल, वाशू भगनानी, दीपशिखा देशमुख आणि जॅकी भगनानी निर्मित या चित्रपटात धमाकेदार अॅक्शन पाहायला मिळणार आहे. 


'सर्कस'मध्ये तगडी स्टारकास्ट


सिनेमात रणवीर सिंह, जॅकलीन फर्नांडिस, पूजा हेगडेसह वरुण शर्मा, जॉनी लीवर आणि संजय मिश्रा अशी तगडी स्टारकास्ट प्रेक्षकांना 'सर्कस' सिनेमात पाहायला मिळणार आहे. रोहित शेट्टीने 'सर्कस' सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. याआधी 'जर्सी' आणि 'केजीएफ 2' या दोन सिनेमांत टक्कर होणार होती. पण 'केजीएफ 2'च्या निर्मात्यांनी या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली. 'केजीएफ 2' हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतो आहे. 


संबंधित बातम्या


KGF 2 Box Office Collection : यशच्या 'केजीएफ 2' चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; जगभरात केली 1160 कोटींची कमाई


Cirkus : रणवीर सिंहच्या 'सर्कस'चे पोस्टर रिलीज; नाताळात सिनेमा होणार प्रदर्शित


KGF 2 in South Korea : भारतच नव्हे, दक्षिण कोरियातही दिसली ‘रॉकी भाई’ची जादू! चित्रपट पाहून चाहते म्हणाले...