Ranveer Allahbadia Vulgar Remark on Parents : कॉमेडियन समय रैना याचा शो 'इंडियाज गॉट लेटेंट' सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. या शोमध्ये युट्युबर रणवीर अलाहबादिया याने विचारलेल्या प्रश्नावरुन वाद निर्माण झाला आहे. रणवीर अलाहबादिया याने स्पर्धकाला पालकांबद्दल आर्क्षेपार्ह प्रश्न विचारला, यानंचर सोशल मीडियावर एकच खळबळ माजली आहे. रणवीरने स्पर्धकाला विचारलं होतं की, कुणालाच्या पालकांना दररोज इंटिमेट होताना पाहायला आवडेल की, त्यांना साथ द्यायला आवडेल. रणवीरच्या या प्रश्नावरुन मोठी कॉन्ट्रोव्हर्सी निर्माण झाली आहे. रणवीरचा हा व्हिडीओ व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी त्याच्यावर निशाणा साधण्यासा सुरुवात केली आहे.

रणवीर अलाहाबादिच्या फालतू प्रश्नावर नेटकरी भडकले

समय रैनाचा 'इंडियाज गॉट लेटेंट' हा शो नेहमीच चर्चेत असतो. शो सुरु झाल्यापासून आतापर्यंत अनेक वादही निर्माण झाले आहेत. आता पुन्हा एकदा यामुळे नवा वाद उफाळून आला आहे. यूट्यूबर आशिष चंचलानी, अपूर्वा मुखिजा आणि रणवीर अलाहबादिया यासारखे सेलिब्रिटी शोच्या नवीन भागांमध्ये सामील झाले होते. या भागात रणवीर अलाहबादियाने एक प्रश्न विचारला, ज्यासाठी त्याला  सोशल मीडियावर युजर्सनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

पालकांचं लैंगिक आयुष्य विनोदाचा विषय?

सध्या विनोद फक्त अश्लीलतेबाबत मर्यादित आहे का, असाही प्रश्न उपस्थित झाले आहेत. फक्त प्रेक्षकांचे मनोरंजन करणे आणि व्ह्यूज मिळवणे हे ध्येय आहे की, काही नैतिक मर्यादा देखील असायला हव्यात? या वादामुळे भारतात कंटेंट क्रिएटर्स आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची जबाबदारी कुठे आहे याबद्दल पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

रणवीर अलाहाबादियाच्या प्रश्नामुळे भारताची सर्जनशील अर्थव्यवस्था कोणत्या दिशेने जात आहे, याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, "फ्रीडम ऑफ स्पीच सगळ्यांनाच आहे. एखाद्याला दुखावण्यात कुठलंही स्वातंत्र्य नाही, मात्र अभिव्यक्तीलाही काही मर्यादा आहेत. आपण समाजात अश्लीलतेचे काही नियम लावले आहेत."

इंडियाज गॉट लेटेंट आणि वाद

'इंडियाज गॉट लेटेंट' हा कॉमेडियन समय रैनाचा शो अनेकदा वादात सापडला आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोणला ट्रोल करणं, अरुणाचल प्रदेशातील लोकांबद्दल विनोद अशा अनेक कारणांमुळे हा शो चर्चेत आला आहे. हा शो कॉमेडीच्या नावाखाली अश्लीलता वाढवत असल्याचं म्हणत आता नेटकऱ्यांनी यावर निशाणा साधला आहे. हा शो वल्गर टीप्पणी करत प्रसिद्धी मिळत असल्याचंही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. पालकांचं लैंगिक आयुष्य कॉमेडीचा विषय कसा असू शकतो, असा सवालही नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे. 'बिअर बायसेप्स' यूट्यूबर रणवीर अलाहबादियाच्या वक्तव्यावरुनही नेटकऱ्यांचा संताप उफाळून आला आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Superstar Of Indian Cinema: 900 फिल्म्समध्ये केलं काम, 700 मध्ये लीड रोल अन् 85 हिरोईन्सचा हिरो; भारतीय सिनेसृष्टीचा एकुलता एक सुपरस्टार, ओळखलं का कोण?