Swatantra Veer Savarkar : नवरात्री आणि दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर निर्माते संदीप सिंह आणि आनंद पंडित यांनी 'स्वातंत्र्यवीर सावरकर' (Swatantra Veer Savarkar) या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hooda) दिग्दर्शित आणि अभिनित 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात झाली असून, वीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त 26 मे 2023 रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.


निर्माते आनंद पंडित या चित्रपटाबाबत बोलताना असे म्हणाले की, ‘या भूमिकेला पूर्ण न्याय देण्यासाठी रणदीप हुड्डाशिवाय दुसरा कोणताही अभिनेता असूच शकत नाही. शिवाय, या चित्रपटाचे दिग्दर्शनही रणदीपच करणार आहे त्यामुळे नक्कीच ही अभिमानाची बाब आहे.’


पाहा पोस्ट :



निर्माते संदीप सिंह म्हणाले की, ‘आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की, रणदीप हुड्डा मुख्य भूमिकेसोबतच आमच्या चित्रपटातून दिग्दर्शक म्हणूनही आपला ठसा उमटवणार आहे.’ ते पुढे म्हणाले की, ‘भारतीय आणि हिंदू या नात्याने स्वातंत्र्यवीर सावरकर हा आमच्यासाठी खास चित्रपट आहे. प्रत्येक भारतीयाने, विशेषत: तरुण पिढीने आपला इतिहास जाणून घ्यावा, अशी माझी इच्छा आहे. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी वीर सावरकरांचे योगदान फार मोठे आहे. अशा या स्वातंत्र्यसैनिकाचा प्रवास या चित्रपटात दाखवला जाईल. हा चित्रपट बनवताना मला विशेष आणि सन्माननीय वाटत आहे.’


रणदीप हुड्डाचा दुसरा बायोपिक


रणदीप हुड्डाने या चित्रपटामधील भूमिकेबद्दल एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं की, 'असे अनेक क्रांतिकारी आहेत, ज्यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. विनायक दामोदर सावरकर यांचे नावही त्यात अग्रक्रमी आहे. त्यांच्याविषयी बऱ्याच चर्चा होत असतात. त्यांच्याबद्दल लोकांना काही गैरसमज आहेत. त्यामुळे त्यांची गोष्ट ही प्रेक्षकांच्या समोर मांडणे गरजेचे आहे.' बॉलिवूड अभिनेता रणदीप हुडा याचा हा दुसरा बायोपिक असणार आहे. याआधी त्याने ‘सरबजीत’ या बायोपिकमध्ये प्रमुख भूमिका साकारली होती. रणदीप हुड्डा आणि चित्रपट निर्माते संदीप सिंह यांनी यापूर्वी 'सरबजीत' चित्रपटात एकत्र काम केले आहे.


'स्वातंत्र्यवीर सावरकर' या चित्रपटाचे चित्रीकरण महाराष्ट्र आणि लंडनमध्ये होणार आहे. 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या चित्रपटाची संकल्पना संदीप सिंह यांची असून, उत्कर्ष नैथानी आणि रणदीप हुड्डा यांनी लिहिलेल्या या चित्रपटाची निर्मिती आनंद पंडित मोशन पिक्चर्स, लिजेंड स्टुडिओ, निर्माते आनंद पंडित, संदीप सिंह आणि सॅम खान यांनी केली आहे. तर, चित्रपटाचे सहनिर्माते म्हणून रूपा पंडित आणि जफर मेहदी यांनी बाजू सांभाळली आहे.


संबंधित बातम्या


Swatantra Veer Savarkar : रणदीप हुडाचा ‘वीर सावरकर’ चित्रपटातील पहिला लूक प्रेक्षकांच्या भेटीला!


Happy Birthday Randeep Hooda : कधी गाडी धुतली, तर कधी वेटरही झाला! वाचा अभिनेता रणदीप हुडाचा फिल्मी प्रवास..