Singer Alfaz: पंजाबी गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला (Sidhu Moosewala) यांच्यावर काही महिन्यांपूर्वी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात सिद्धू मुसेवाला यांचे निधन झाले. आता आणखी एका पंजाबी गायकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या गायकाचं नाव अल्फाज (Alfaz) असं आहे. अल्फाजवर हल्ला झाल्यानं पंजाबी चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे. अनेक पंजाबी गायक अल्फाजच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहेत. 

हनी सिंहनं शेअर केली पोस्टअल्फाजचा रुग्णालयातील फोटो शेअर करुन प्रसिद्ध रॅपर हनी सिंहनं त्याच्या चाहत्यांना अल्फाजच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले. हनी सिंहनं पोस्टमध्ये लिहिलं, 'काल रात्री अल्फाज या माझ्या भावावर कोणी तरी हल्ला केला. ज्याने हा हल्ला केला, त्याला मी सोडणार नाही. सर्वांना विनंतर त्याच्यासाठी प्रार्थना करा. 'हनी सिंहनं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करुन अल्फाजच्या हेल्थबाबत अपडेट दिली. त्यानं पोस्ट शेअर करत लिहिलं,'अल्फाजच्या प्रकृतीबाबत जाणून घेण्यासाठी मी नुकतीच रुग्णालयाला भेट दिली. तो सध्या ICU मध्ये आहे.' तर दुसऱ्या पोस्टमध्ये हनी सिंहनं लिहिलं, ' ज्यांच्या टेम्पोनं अल्फाजला काल रात्री टक्कर दिली त्यांना पोलिसांनी पकडले आहे. त्यामुळे मी मोहाली पोलिसांचे आभार मानतो.अल्फाजची प्रकृती आता स्थिर आहे. '

अल्फाजनं 2500 पेक्षा जास्त गाणी लिहिली 

अल्फाज हा हनी सिंहचा जवळचा मित्र आहे. त्यानं वयाच्या 14 व्या वर्षी गाणं लिहायला सुरुवात केली. अल्फाजनं 12 वीमध्ये असताना कॉल सेंटरमध्ये काम करायला सुरुवात केली. त्या दरम्यान तो गाणी देखील गायचा. अल्फाजनं 2500 पेक्षा जास्त गाणी लिहिली आहे. त्याच्या 2011 साली रिलीज झालेल्या हाय मेरा दिल या गाण्यानं प्रेक्षकांची पसंती मिळवली. 

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:

Entertainment News Live Updates 3 October : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!